एक्स्प्लोर

Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब

Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: ऑलिम्पियन नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान मिळविलं आहे.

Neeraj Chopra wins Lausanne Diamond League with 87.66m throw: भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून पहिलं स्थान पटकावलं. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये भाला 88.67 मीटर फेकून पहिला क्रमांक पटकावला होता.

नीरज चोप्रानं यंदाच्या मोसमात उत्तम पुनरागमन केलं आहे. नीरज 5 मे रोजी दोहा डायमंड लीगनंतर इतर कोणत्याही स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एफबीके गेम्स (FBK Games) आणि पावो नूरमी गेम्स (Paavo Nurmi Games) या दोन्ही स्पर्धांमधून नीरजनं दुखापतीमुळे माघार घेतली होती. 

नीरज चोप्रानं या लीगच्या पाचव्या फेरीत 87.66 मीटर फेक करून हे विजेतेपद पटकावलं. दरम्यान, त्यानं या फेरीत फाऊलनं सुरुवात केली आणि नंतर 83.52 मीटर, त्यानंतर 85.04 मीटर भाला फेक केली. त्यानंतर चौथ्या फेरीत नीरजकडून आणखी एक फाऊल झाला, पण त्याच्या पुढच्याच फेरीत नीरजनं 87.66 मीटरवर भाला फेकला. नीरजचा शेवटचा थ्रो 84.15 मीटर होता, पण पाचव्या फेरीत नीरजची बरोबरी कोणताही खेळाडू करू शकला नाही. त्यामुळेच नीरजनं डायमंड लीगचा खिताब पटकावला. 

90 मीटरचा टप्पा पार करण्याचं लक्ष्य

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं 2023 मध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडण्याचं ध्येय असल्याचं सांगितलं होतं. मात्र, याबाबत आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचं त्यांनं सांगितलं होतं. नीरजची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट 89.94 मीटर आहे, त्यावेळी त्यानं स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये जगज्जेता अँडरसन पीटर्ससह दुसरं स्थान पटकावलं होतं.

दोहा डायमंड लीगमध्येही ठरला होता चॅम्पियन

नीरज चोप्रानं 2023 च्या मोसमाची धमाकेदार सुरुवात केली होती. दोहा येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये त्यानं शानदार विजयाची नोंद केली. या स्पर्धेत नीरजनं विक्रमी 88.67 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकलं होतं.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत नीरजनं इतिहास रचला होता. भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या यशानंतर नीरजचा अद्भुत प्रवास सुरू आहे. यावर्षी त्यानं डायमंड लीग जिंकून इतिहास रचला आणि आता तो जागतिक नंबर 1 भालाफेकपटू बनला आहे.

भालाफेकमध्ये नीरज चोप्रा 'नंबर वन'

दोहा येथे आयोजित डायमंड लीग जिंकल्यानंतर नीरजनं भालाफेकच्या क्रमवारीत आणखी एक यश मिळवलं. 22 मे रोजी तो नंबर-1 अॅथलीट बनला होता. यासह नीरज चोप्रानं पुन्हा एकदा इतिहास रचून भारताचं नाव उंचावलं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा आता भालाफेक रँकिंगमध्ये नंबर 1 खेळाडू बनला आहे. नीरजनं प्रथमच हे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget