एक्स्प्लोर

Morning Headlines 9th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

आता मैत्रीचा नवा अध्याय सुरू करू, वाक्य संपण्यापूर्वीच घोसाळकरांवर फायरिंग, मॉरिसने जुना राग काढला, दोघांचाही गेम झाला! 

मुंबई :  मुंबईतील दहिसर (Mumbai Dahisar Firing)  परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)  यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या (Morris Noronha) स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. घोसाळकर आणि नोरोन्हा काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. तब्बल 40 मिनिटं हे फेसबुक लाईव्ह चाललं. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तुल काढलं, आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. गोळीबारामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर 

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात  

Abhishek Ghosalkar Firing Case : मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मेहुल पारीख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात असून, तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा याने केला होता. तर, मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी 1 पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहे. वाचा सविस्तर 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय; घरावरील रोषणाई केली बंद

शिवसेना उपनेते तथा माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबई महानगर महापालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे मुंबईसह राज्यात खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज आपला वाढदिवस (Birthday) साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे काल रात्री ठाण्यातील निवासस्थान असलेल्या शुभदीपवर करण्यात आलेली रोषणाई देखील बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते.वाचा सविस्तर

देशात पुन्हा मोदी सरकार, एनडीएला 335 जागा मिळण्याची शक्यता, काँग्रेसची धाकधूक वाढवणारा सर्व्हे समोर
 
Mood of The Nation Survey : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) देशात एनडीए आणि इंडिया असा सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात (Mood of The Nation Survey ) धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणानुसार देशात आज सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर एनडीए हॅट्ट्रिक करू शकते. 543 पैकी एनडीएला 335 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, 166 जागा इंडिया ब्लॉकच्या खात्यात जाऊ शकतात. इतरांना 42 जागा मिळू शकतात. यापैकी भाजप एकहाती 304 जागा जिंकू शकतो. काँग्रेसला 71 तर इतरांना 168 जागा मिळू शकतात. राज्यस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये भाजप सर्व जागा जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसला या राज्यात खातेही उघडता येणार नाही, असा अंदाज सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. वाचा सविस्तर  

देशातील हवामानात बदल, 'या' राज्यात पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाची स्थिती 

IMD Weather News : देशातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे, तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी आणि धुक्याचा त्रास हळूहळू कमी होत आहे. तर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता जाणावत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, आज अरुणाचल प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता आहे. यासोबतच आज किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा सविस्तर

Uttarakhand Violence : उत्तराखंड हल्दवानी हिंसाचारात 4 ठार, 100 हून अधिक पोलीस जखमी, पोलीस सतर्क, इंटरनेट सेवा बंद 

Uttarakhand Violence : उत्तरखंडातील हल्दवानी येथील वनभुलपुरा येथील मलिक यांच्या बागेत बांधलेली बेकायदेशीर मशीद तसेच मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या प्रशासन आणि पोलिसांवर तसेच प्रसारमाध्यमांवर गुरुवारी सायंकाळी मुस्लिम समाजाच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात चार हल्लेखोरांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. हल्द्वानीमध्ये इंटरनेट सेवा बंद आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात पोलीस सतर्क झाले आहेत. वाचा सविस्तर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये 6 महिन्यात दुसऱ्यांदा फायनल, रोहितच्या पराभवाचा बदला घेण्याची युवा ब्रिगेडकडे संधी 

U19 World Cup 2024 Final, IND vs AUS : रविवारी भारत आणि ऑस्ट्रलियामध्ये  अंडर 19 वर्ल्डकप फायनल (World Cup Final) होणार आहे. गुरुवारी सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर (Aus vs Pak) थरारक विजय मिळवला. भारत यापूर्वीच फायनलमध्ये पोहोचलाय. सहा महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दुसऱ्यांदा फायनलमध्ये दाखल झाले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा पराभव करत पॅट कमिन्सच्या संघाने जेतेपद मिळवले होते. आता याच पराभवाचा बदला घेण्याची संधी युवा भारतीय संघाकडे असेल.  सविस्तर वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget