एक्स्प्लोर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये 6 महिन्यात दुसऱ्यांदा फायनल, रोहितच्या पराभवाचा बदला घेण्याची युवा ब्रिगेडकडे संधी

U19 World Cup 2024 Final, IND vs AUS : 19 वर्षाखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात, रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल.

U19 World Cup 2024 Final, IND vs AUS : रविवारी भारत आणि ऑस्ट्रलियामध्ये  अंडर 19 वर्ल्डकप फायनल (World Cup Final) होणार आहे. गुरुवारी सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर (Aus vs Pak) थरारक विजय मिळवला. भारत यापूर्वीच फायनलमध्ये पोहोचलाय. सहा महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दुसऱ्यांदा फायनलमध्ये दाखल झाले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा पराभव करत पॅट कमिन्सच्या संघाने जेतेपद मिळवले होते. आता याच पराभवाचा बदला घेण्याची संधी युवा भारतीय संघाकडे असेल. 

अंडर-19 वर्ल्डच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एक विकेटनं पराभव केला. अखेरच्या षटकांपर्यंत चाललेल्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने संयमाने पाकिस्तानच्या माऱ्याचा सामना करत फायनलमध्ये प्रवेश केला. आता 11 फेब्रुवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विलोमूर पार्कमध्ये अंतिम लढत होणार आहे. सहा महिन्याच्या आत दुसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी भिडणार आहेत. 2023 मध्ये वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना झाला होता. त्या सामन्यात पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्वचषक उंचावला होता. आता भारताच्या युवा ब्रिगेडकडे हा बदला घेण्याची सूवर्णसंधी असेल. 

सहा महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मारली होती बाजी - 

वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये भारताच्या सिनिअर संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या सिनिअर संघाचा आमनासामना झाला होता. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियाने चार विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केले होते. ट्रेविस हेड याने शतकी खेळी केली होती. 

बदला घेण्याची सूवर्णसंधी - 

आता 11 फेब्रुवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पुन्हा एकदा लढत होत आहे. अंडर 19 च्या या फायनलकडे जगभरातील क्रीडा चाहत्यांचं लक्ष असेल. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत बदला घेण्याची संधी युवा ब्रिगेडकडे असेल. 2023 च्या पराभवाची सल प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. युवा भारतीय संघातील कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सचिन धास, सौमी पांडे यासारखे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. भारतीय संघाला विजयाचा दावेदारही म्हटले जातेय. टीम इंडियाने आतापर्यंत एकतर्फी विजय मिळवलाय. 

आणखी वाचा :

Mumbai Indians IPL 2024 : हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माची मुंबईतील लढाई सोशल मीडियापर्यंत येऊन पोहोचली? खरं काय अन् खोटं काय??

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PSL च्या अब्रूचे धिंडवडे! पाकिस्तान क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या आतापर्यंतच्या 5 लज्जास्पद घटना, नेमकं काय काय घडलं?
PSL च्या अब्रूचे धिंडवडे! पाकिस्तान क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या आतापर्यंतच्या 5 लज्जास्पद घटना, नेमकं काय काय घडलं?
GT vs MI Live Score IPL 2026 : रोहित शर्मा OUT?, गुजरातविरुद्ध अशी असणार मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग-11, जाणून घ्या LIVE अपडेट्स
GT vs MI Live Updates : रोहित शर्मा OUT?, गुजरातविरुद्ध अशी असणार मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग-11, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Team India Squad News : बीसीसीआयचा 'ब्रह्मास्त्र' सज्ज, एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ मैदानात उतरणार; श्रेयस अय्यर कर्णधार?
बीसीसीआयचा 'ब्रह्मास्त्र' सज्ज, एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ मैदानात उतरणार; श्रेयस अय्यर कर्णधार?
Vaibhav Suryavanshi Crying : राजस्थान हरली, वैभव सूर्यवंशी कॅमेऱ्यामागे ढसाढसा रडला... सांत्वन करायला KKRचा खेळाडू आला, नेमकं काय घडलं? Viral Video
राजस्थान हरली, वैभव सूर्यवंशी कॅमेऱ्यामागे ढसाढसा रडला... सांत्वन करायला KKRचा खेळाडू आला, नेमकं काय घडलं? Viral Video

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Recruitment:करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज कधीपासून भरता येणार? पगार किती मिळणार?  
करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती,  पगार किती मिळणार? अर्ज कसा करायचा?
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार
Pachpadra Refinery: राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
Embed widget