महाराष्ट्रात कुठं ढगाळ वातावरण तर कुठं पावसाची शक्यता, कसं असेल राज्यातील हवामान?
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, 11 फेब्रुवारी (रविवार) पर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा दिलेला अंदाज कायम असल्याची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली. तर ढगाळ वातावरणाने थंडी काहीशी कमी झाली आहे. सध्या कमाल व किमान दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा वाढीव असली तरी असली तरी रात्री व पहाटे थंडी ही जाणवतच असल्याचे खुळे म्हणाले.
दरम्यान, माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार
मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा एकूण 10 जिल्ह्यात 11 व 11 फेब्रुवारी (शनिवार व रविवार) ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
मराठवाडा
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यात 9 10 आणि 11 फेब्रुवारीला (शुक्रवार ते रविवार) पावसाची शक्यता आहे.
विदर्भात पावसाची शक्यता
विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी (शनिवार ते बुधवार)ला विशेषतः 10 ते 11 फेब्रुवारी(शनिवार व रविवारी)'ह्या दिवशी पावसाची शक्यता अधिकच जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता नाही
मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात आकाश केवळ निरभ्रच राहण्याची शक्यता आहे. सध्या जी काही थंडी पडत आहे, तशीच थंडी जाणवणार आहे. पावसाची शक्यता मात्र जाणवत नसल्याची माहिती माणिकराव खुळ यांनी दिली आहे.
देशाची राजधानी दिल्लीच्या हवामानात (Delhi Weather) चढ-उतार सुरूच आहे. दिल्लीतील किमान तापमान अचानक 7.2 अंशांवर आले आहे. जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी कमी आहे. देशातील हवामानात (Weather Update) दिवसेंदिवस बदल होत आहेत. उत्तर भारतात काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळं नागरिकांना थंडीपासून किंचित दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढच्या आठवड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: