Morning Headlines 5th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
विश्वचषकाच्या महायुद्धाला अहमदाबादच्या रणांगणात तोंड फुटणार, इंग्लंड-न्यूझीलंड संघांमध्ये सलामीची लढाई
आयसीसी वन डे विश्वचषकाच्या महायुद्धाला आजपासून अहमदाबादच्या रणांगणात सुरुवात होत आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची ठिणगी पडणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. (वाचा सविस्तर)
सोनं झालं स्वस्त! लग्नसराई-सणासुदीसाठी सोने खरेदी करायचीय? सविस्तर जाणून घ्या
पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. सणासुदीच्या काळात किंवा लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तसेच जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तर तुमच्यासाठी चांगले दिवस आले आहेत. कारण आता तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करावे लागतील. कारण आजचे दर पाहता सोन्याचे भाव कमी झालेले दिसत आहेत. (वाचा सविस्तर)
भारताने रचला इतिहास! आतापर्यंत 18 सुवर्णपदके जिंकली, 72 वर्षांच्या इतिहासात प्रथमच पराक्रम
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 12 पदके जिंकली. भारताने मंगळवारी 3 सुवर्णपदके जिंकली. याशिवाय भारतीय खेळाडूंनी 5 रौप्य पदके आणि 4 कांस्य पदके जिंकली. त्याचबरोबर, आत्तापर्यंत भारतीय खेळाडूंनी 18 सुवर्ण पदकांसह 31 रौप्य आणि 32 कांस्यपदक जिंकले आहेत. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या 81 झाली आहे. (वाचा सविस्तर)
निवडणूक आयोगासमोरील सुनावणी आधीच शरद पवारांना धक्का; पाठिंबा देणाऱ्या खासदाराची संख्या घटली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि निवडणूक चिन्ह कोणाचे हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) गेला असताना दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आणखी धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल (Mohammed Faizal) लोकसभेतून पुन्हा अपात्र (Mohammed Faizal Disqualified from Lok Sabha) झाले आहेत. (वाचा सविस्तर)
Petrol Diesel Rate Today : कच्च्या तेलाच्या दरात घट, 'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त, विविध महानगरांतील दर जाणून घ्या
सरकारी तेल कंपन्यांकडून देशातील विविध राज्य आणि शहरांनुसार दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर अपडेट केले जातात. गुरुवारी अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरात बदल करण्यात आला आहे. काही ठिकाणी भाव वाढले आहेत तर काही ठिकाणी भावही कमी झाले आहेत. (वाचा सविस्तर)
नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी याच रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जात 12 बालकांचा देखील समावेश होता. (वाचा सविस्तर)
मोनिकासोबत प्रेमसंबंध उघड, बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग प्रस्ताव, फातिमा बिबी पहिल्या महिला न्यायाधीश; आज इतिहासात
आजच्याच दिवशी ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला भारतात नाणे पाडण्यास मंजुरी दिली. जगभरात संगणक आणि मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती आणण्याच्या कार्यात अग्रेसर असणारे आणि अॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्ज (Steve Jobs) यांचे 5 ऑक्टोबर 2011 रोजी निधन झालं. जाणून घेऊया आजच्या दिवस इतिहासातील कोणत्या घटनांचा साक्षीदार आहे. (वाचा सविस्तर)
आजचा गुरुवार कसा राहील, कोणत्या राशींना होणार लाभ? पाहा आजचं राशीभविष्य
आज 05 ऑक्टोबर 2023 गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या मुलाच्या करिअरची काळजी वाटत असेल, तर चिंता करू नका. वृश्चिक राशीचे लोक आज घराच्या नूतनीकरणाबाबत चर्चा करू शकतात. इतर राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया. (वाचा सविस्तर)