एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nanded Death Case : नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप

Nanded Death Case : नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी याच रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जात 12 बालकांचा देखील समावेश होता. दरम्यान, यावेळी बालकासह तिच्या मातेचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली होती. तर, नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि आज तिचा सुद्धा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणात कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, नातेवाईक रुग्णालयात दाखल असताना बाहेरुन 45 हजारांहून अधिकची औषधी खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडले होते. तसेच रक्त व इतर तपासण्यासाठीही पैसेही खर्च करण्यात आले होते. त्यात अधिष्ठाता डॉ. एस. आर.वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी जाणीवपूर्वक उपचाराकडे दुर्लक्ष केले. डॉक्टर उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे माय-लेकाचा मृत्यू झाल्याची तक्रार कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप? 

कामाजी टोम्पे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्री 1  वाजेच्या सुमारास अंजली यांची नैसर्गिक प्रसूती होऊन तीला मुलगी झाली. प्रसूती झाली तेंव्हा अंजली व तिच्या बाळाची तब्येत चांगली असल्याचे तेथील डॉक्टरांनी व स्टाफने सांगीतले. त्यानंतर, सकाळ झाल्यानंतर अंजली हीचे रक्त जास्त जात आहे. बाळाची तब्येत बिघडली आहे, असे डॉक्टारांनी सांगीतले. तसेच, रक्ताचे व पेशीचे पॉकेटसह इतर मेडीकल बाहेरुन आणण्यासाठी सांगीतले गेले. त्यानंतर कामाजी टोम्पे यांनी मेडीकल साहीत्य बाहेरुन आणुन डॉक्टारांना दिले. परंतु, त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी डीन वाकोडे यांच्याकडे धाव घेतली. माझ्या मुलीचे व तिच्या बाळाची प्रकृती गंभीर असुन रक्त जास्त जात आहे. तुम्ही ताबडतोब डॉक्टर पाठवा अशी विनंती केली. परंतु, त्यांनी कोणतेही हालचाल न करता जाणूनबुजून  कामाजी टोम्पे यांना तिथेच बसुन ठेवले. बराच वेळ झाल्यावरही कोणतेही डॉक्टर व नर्स पाठवण्यात आले नाही. अंजली आणि त्यांचे बाळ मरणाच्या दारात असताना सुद्धा डीन वाकोडे यांनी कोणतेही हालचाल केली नसल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded Death Case : सरकारी रुग्णालयात मृत्यूचे थैमान: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Embed widget