Morning Headlines 27th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राजकारणासाठी दहशतवादाला प्रोत्साहन देणं चुकीचं, UN मध्ये जयशंकर यांनी फटकारलं; कॅनडाची लोकशाहीचे दाखले देत रडारड, काय घडलं?
India-Canada Relations: कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारतावर (India) खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी न्यूयॉर्कमध्ये (New York) संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत बोलताना कॅनडाला खडे बोल सुनावले आहेत. राजकारणासाठी दहशतवादाला प्रोत्साहन देणं चुकीचं असल्याचं म्हणत त्यांनी थेट कॅनडावर निशाणा (India Canada Tensions) साधला आहे. तसेच, याला उत्तर देताना कॅनडानंही परकीय शक्तींच्या हस्तक्षेपामुळे लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. वाचा सविस्तर
NIA Raid : एनआयए ॲक्शन मोडमध्ये! खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात मोठी कारवाई; दिल्ली,उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी
NIA Action : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ॲक्शन मोडमध्ये असून खलिस्तानी दहशतवादी (Khalistani) आणि गँगस्टर्स (Gangsters) विरोधात मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एनआयएने यूपी-दिल्लीसह 5 राज्यांमध्ये 50 हून अधिक ठिकाणी छापेमारी (NIA Raid Updates) केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorist) आणि गँगस्टर्सच्या हालचालींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळां आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (National Investigation Agency) हाती खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स संबंधात सुत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. यानुसार, खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स यांचा एकमेकांशी संबंध असल्याचीही मोठी धक्कादायक माहिती समोर आली असून एनआयएकडून त्या दृष्टीने तपास सुरु आहे. वाचा सविस्तर
Weather Update : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह 'या' भागात पावसाचा अंदाज, देशाभरात आजचं हवामान कसं असेल?
मुंबई : देशात परतीच्या पावसाला सुरुवात (Weather Forecast) झाली असून काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. आज बुधवारी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांसह देशभरात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्येही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज 26 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडूसह कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. वाचा सविस्तर
Iraq Fire Accident: इराकमध्ये लग्नसोहळ्यात अग्नी तांडव, वधू वरासह 100 वऱ्हाड्यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू
Iraq Fire Accident: इराकमध्ये लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत 100 जणांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहे. उत्तर इराकच्या (Iraq) के नेवेहमधील (Nineveh) अल-हमदानिया भागात ही दुर्घटना घडली आहे. नेवेह प्रांत मोसुलच्या बाहेर राजधानी बगदादपासून जवळपास 335 किलोमीटर अंतरावर आहे. इराकी वृत्तसंस्था नीना (National Iraqi News Agency) यांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण आगीत वधू वराचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे. अद्याप आगीचे कारण समोर आलेले नाही. वाचा सविस्तर
India vs Australia Series: आज ऑस्ट्रेलियाविरोधात तिसरी वनडे; कांगारूंना क्लीन स्विप दिला तर क्रिकेटमध्ये रचला जाणार इतिहास
India vs Australia Series: वनडे विश्वचषक (ODI World Cup 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे. त्यापूर्वी टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) मायदेशात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा दारुण पराभव केला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून त्यात टीम इंडियानं बाजी मारली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (27 सप्टेंबर) राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे. वाचा सविस्तर
27th September In History : समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचे निधन, भगतसिंह यांचा जन्म तर गुगल सर्च इंजिनची सुरुवात; आज इतिहासात
मुंबई : 27 सप्टेंबर या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्याच दिवशी म्हणजेच 27 सप्टेंबर 1883 रोजी समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले होते. तर आजच्याच दिवशी इतिहासात लॅरी पेज आणि सर्जी बेन यांनी गुगल सर्च इंजिनचा शोध लावला.तसेच भारतीय क्रांतिकारकांचे मेरूमणी भगतसिंह यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. 2020 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकांना मंजुरी दिली होती. 1996 मध्ये तालिबानने काबुलवर ताबा मिळवला होता. वाचा सविस्तर
Horoscope Today 27 September 2023 : मेष, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी बुधवारी चुकूनही हे काम करू नये, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 27 September 2023 : राशीभविष्यानुसार 27 सप्टेंबर 2023 बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांना आज दुसऱ्या शहरात शिक्षण घ्यायचे असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. तूळ राशीच्या लोकांसाठी पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उजळेल. इतर राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर