एक्स्प्लोर

राजकारणासाठी दहशतवादाला प्रोत्साहन देणं चुकीचं, UN मध्ये जयशंकर यांनी फटकारलं; कॅनडाची लोकशाहीचे दाखले देत रडारड, काय घडलं?

India Canada Tensions : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरुन कॅनडा आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटल्याचं पाहायला मिळत आहे.

India-Canada Relations: कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारतावर (India) खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी न्यूयॉर्कमध्ये (New York) संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत बोलताना कॅनडाला खडे बोल सुनावले आहेत. राजकारणासाठी दहशतवादाला प्रोत्साहन देणं चुकीचं असल्याचं म्हणत त्यांनी थेट कॅनडावर निशाणा (India Canada Tensions) साधला आहे. तसेच, याला उत्तर देताना कॅनडानंही परकीय शक्तींच्या हस्तक्षेपामुळे लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. 

जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशातच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत बोलताना कॅनडाचं नाव न घेता थेट निशाणा साधला आहे. एस. जयशंकर म्हणाले की, "आता ते दिवस गेले, जेव्हा काही देश एक अजेंडा ठरवायचे आणि इतर देशांनीही त्याचं पालन करावं अशी अपेक्षा ठेवायचे. आजही काही देश अजेंडा सेट करत आहेत, पण आता ते दिवस गेले, आता हे नाही चालणार. राजकीय सोयीसाठी दहशतवाद, अतिरेकी आणि हिंसाचारावर कारवाई करू नये. प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि सोयीनुसार अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करता येत नाही. अजूनही असे काही देश आहेत, जे एका निश्चित अजेंड्यावर काम करतात, परंतु हे नेहमीच होऊ शकत नाही आणि त्याविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे. वक्तव्यापासून वास्तव फारच दूर असताना त्याविरोधात आवाज उठवण्याची हिंमत असली पाहिजे." 

जयशंकर म्हणाले की, "भारताला विविध भागीदारांसोबत सहकार्य वाढवायचं आहे. आता आपण अलायन्मेटच्या युगातून जागतिक मित्र देशांमध्ये विकसित झालो आहोत. हे क्वाडच्या विकासात आणि ब्रिक्स समुहाच्या विस्तारामध्ये दिसून येते. आम्ही परंपरा आणि तंत्रज्ञान दोन्ही आत्मविश्वासानं एकत्र आणतो. हा समन्वय आजच्या भारताची व्याख्या करतो, हा भारत आहे." पुढे बोलताना जयशंकर यांनी कॅनडावर निशाणा साधत चीन आणि पाकिस्तानंलाही लक्ष्य केलं. प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे निर्देश देत त्यांनी चीनला फैलावर घेतलं. 

कॅनडाकडून UNGA मध्ये लोकशाहीचे दाखले 

संयुक्त राष्ट्रातील कॅनडाचे राजदूत बॉब रे म्हणाले की, "परकीय हस्तक्षेपामुळे लोकशाही धोक्यात आली आहे आणि त्यामुळे राजकीय फायद्यासाठी झुकता येणार नाही. ज्या वेळी आपण समानतेचे महत्त्व पटवून देतो, त्यावेळी आपल्याला न्याय्य आणि लोकशाही समाजाची मूल्यं जपली पाहिजेत. कोणाच्याही राजकीय फायद्यासाठी आम्ही झुकणार नाही. कारण परकीय हस्तक्षेपामुळे लोकशाही धोक्यात आल्याचं दिसून येत आहे. सत्य हे आहे की, आपण मान्य केलेले नियम आपण पाळले नाहीत तर त्यामुळे आपल्या मुक्त समाजाची जडणघडण तुटू लागेल."

भारताच्या कठोर भूमिकेनंतर कॅनडातील खलिस्तानी आंदोलनांचा प्रभाव कमी 

कॅनडाकडून निज्जर यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आल्यानंतर भारतानं कॅनडाबाबत कठोर पावलं उचलली आहेत. भारताच्या या भूमिकांचा परिणाम कॅनडातही दिसून आला. कॅनडानं आरोप केल्यापासूनच कॅनडात भारताविरोधात आंदोलन करणाऱ्यांना सूट देण्यात आली होती. कॅनडात ठिकठिकाणी खलिस्तान्यांकडून निदर्शनं केली जात होती. परंतु, भारतानं घेतलेल्या कठोर भूमिकांनंतर ही आंदोलनं फिकी पडल्याचं दिसून आलं. सोमवारी भारतीय कॉन्सुलेटच्या बाहेर मोजकीच लोकं आंदोलनासाठी उपस्थित असल्याचं दिसून आलं.  

भारत आणि कॅनडातील वादाचं नेमकं कारण काय? 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, भारत सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आम्ही चिथावणी देण्याचा किंवा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही फक्त वस्तुस्थिती मांडत आहोत." तसेच, पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही सर्व काही स्पष्ट करण्यासाठी आणि योग्य प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारसोबत काम करू इच्छितो." दरम्यान, कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर 18 जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली होती. याच प्रकरणी कॅनडाकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आले असून भारतानं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget