NIA Raid : एनआयए ॲक्शन मोडमध्ये! खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात मोठी कारवाई; दिल्ली,उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी
NIA Raid Updates : सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सध्या अलर्ट मोडवर आहे. खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात NIA ची मोठ्या कारवाईला सुरुवात केली आहे. 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी सुरु आहे.
NIA Action : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ॲक्शन मोडमध्ये असून खलिस्तानी दहशतवादी (Khalistani) आणि गँगस्टर्स (Gangsters) विरोधात मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एनआयएने यूपी-दिल्लीसह 5 राज्यांमध्ये 50 हून अधिक ठिकाणी छापेमारी (NIA Raid Updates) केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorist) आणि गँगस्टर्सच्या हालचालींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळां आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (National Investigation Agency) हाती खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स संबंधात सुत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. यानुसार, खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स यांचा एकमेकांशी संबंध असल्याचीही मोठी धक्कादायक माहिती समोर आली असून एनआयएकडून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणाकडून मोठी कारवाई
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA-National Investigation Agency) देशभरात खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधातील कारवाई वेगवाग केली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब तसेच राजस्थान या भागात 50 हून अधिक ठिकाणी छापेमारी सुरु आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक गँगस्टर्स लूपन बसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक कुख्यात गुंडांनी (Gangsters) आश्रय घेतला असून त्यांचा संबंध खलिस्तानी दहशतवाद्यांशी असल्याचं सांगितलं जात आहे. या संबंधात तपास यंत्रणेच्या हाती महत्वाची माहिती लागली आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात छापेमारी करण्यात येत आहे.
पाच राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी
गेल्या काही महिन्यांमध्ये देश-विदेशात खलिस्तानी कारवायांना वेग आल्याचं दिसून येत आहे. पंजाब, हरियाणा भागातही खलिस्तानी दहशतवादी ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. खलिस्तानी दहशतवादी विविध कारवायांसाठी गँगस्टर्सची मदत घेत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती लागली आहे. खलिस्तानी गँगस्टर्सकडून पैसे देऊन कारवाया करत आहेत. यासाठी खलिस्तानींना पैशांची गरज आहे. हा निधी पाकिस्तानातून अंमली पदार्थ तस्करी करून मिळवला जात, असल्याची माहिती आहे.
खलिस्तानी-गँगस्टर्सचा पाकिस्तानशीही संबंध
धक्कादायक बाब म्हणजे खलिस्तानी-गँगस्टर्संना भारताच्या शेजारील देश आणि शत्रू पाकिस्तान खतपाणी घालत असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. खलिस्तानी-गँगस्टर्सचा पाकिस्तानशी संबंधाचे पुरावे सापडले आहे. पाकिस्तान खलिस्तानी-गँगस्टर्संना फंडींग करत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासोबतच दहशतवादीही भारतात पाठवत आहे. या कामासाठी इस्लामी दहशतवाद्यांऐवजी खलिस्तानी दहशतवाद्यांची मदत घेतली जात आहे. कॅनडात बसलेले खलिस्तानी दहशतवादी आयएसआयच्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :