एक्स्प्लोर

Iraq Fire Accident: इराकमध्ये लग्नसोहळ्यात अग्नी तांडव, वधू वरासह 100 वऱ्हाड्यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू

इराकी समाचार एजन्सी नीना यांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण आगीत वधू वराचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे. अद्याप आगीचे कारण समोर आलेले नाही. 

Iraq Fire Accident: इराकमध्ये लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग लागली आहे.  या आगीत 100 जणांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहे. उत्तर इराकच्या (Iraq)  के नेवेहमधील (Nineveh) अल-हमदानिया भागात ही दुर्घटना घडली आहे. नेवेह प्रांत मोसुलच्या बाहेर राजधानी बगदादपासून जवळपास 335 किलोमीटर अंतरावर आहे. इराकी वृत्तसंस्था नीना (National Iraqi News Agency) यांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण आगीत वधू वराचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे. अद्याप आगीचे कारण समोर आलेले नाही. 

 दरम्यान समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार फटाक्यांमुळे ही आग लागली आहे. इराकी वृत्तसंस्था नीनाने या आगीच्या दृश्यांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये फायरफायटर आग विझवण्याचे काम करत आहे. तसेच सोशल मीडिया आणि स्थानिक पत्रकारांनी  शेअर केलेल्या फोटोंमध्ये लग्नसोहळ्याच्या हॉलचे फोटो टाकण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण हॉल जळून खाक झाला आहे. 

इराकी वृत्तसंस्था नीनाच्या हवाल्यानुसार विवाहस्थळी असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका झाला आहे. इराकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका उडाला. तसेच हॉलच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य सुमार दर्जाचे असल्याने  काही मिनिटातच आगीमुळे हॉलचा काही भाग कोसळला. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वार्ताहराने घटनास्थळी चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान वाचलेल्यांच्या शोधात इमारतीच्या ढिगाऱ्यावर चढताना दिसत आहे,

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीं आणि आगीतून वाचलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीला आग स्थानिक वेळेनुसार 10:45 च्या सुमारास लागली. त्यावेळी शेकडो लोक लग्नमंडपात लग्नसोहळा साजरा करत होते. अधिकृत निवेदनानुसार इराकी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके पाठवली आहेत.तसेच जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी अधिकाऱ्यांना या दुर्दैवी घटनेमुळे जखमी झालेल्या लोकांना मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहे. इराकच्या पंतप्रधान कार्यालयाने X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये माहिती दिली.

हे ही वाचा :                             

Pune Fire : मोठी दुर्घटना टळली, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आरती करत असतानाच लागली आग, सुरक्षा रक्षकांनी तातडीने काढलं बाहेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget