एक्स्प्लोर

India vs Australia Series: आज ऑस्ट्रेलियाविरोधात तिसरी वनडे; कांगारूंना क्लीन स्विप दिला तर क्रिकेटमध्ये रचला जाणार इतिहास

IND vs AUS 3rd ODI : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे.

India vs Australia Series: वनडे विश्वचषक (ODI World Cup 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे. त्यापूर्वी टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) मायदेशात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा दारुण पराभव केला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून त्यात टीम इंडियानं बाजी मारली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (27 सप्टेंबर) राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे.

जर टीम इंडियानं हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाला क्लीन स्विप देत इतिहास रचेल. तसेच, टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरेल. खरं तर तिसरा सामना जिंकून भारतीय क्रिकेट संघ सध्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा क्लीन स्वीप करेल.

ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लीन स्विप करणार टीम इंडिया 

जर आजच्या सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली तर क्रिकेटच्या इतिहासात हा एक मोठा विक्रम ठरेल. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, भारतीय क्रिकेट संघ दोन किंवा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीपसह पराभूत करेल. दरम्यान, 1984 पासून आतापर्यंत टीम इंडियानं दोन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत कधीही ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप केलेला नाही. 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरीजमधील हेड-टु-हेड आकडेवारी 

  • एकूण वनडे सीरीज : 14 
  • ऑस्ट्रेलियाचा विजय : 8 
  • टीम इंडियानं जिकल्यात : 6

टीम इंडियात दोन्ही संघांमधील सीरिजमध्ये हेड-टु-हेड 

  • एकूण वनडे सीरीज : 11 
  • ऑस्ट्रेलियानं जिंकल्यात : 6
  • टीम इंडियानं जिंकल्यात : 5

टीम इंडिया व्हायरल फिवरच्या विळख्यात 

आजच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार कर्णधार रोहित शर्मानं पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे. रोहितनं सांगितलं की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या राजकोट वनडेमध्ये निवडीसाठी 5 खेळाडू नसतील. भारतीय क्रिकेट संघ सध्या व्हायरल फिव्हरच्या विळख्यात अडकला असून काही खेळाडू आजारपणामुळे घरी परतले आहेत. 

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्लेईंग-11 निवडण्यासाठी केवळ 13 खेळाडू उपस्थित राहतील. दिलासादायक बाब म्हणजे, पहिल्या दोन सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आलेले रोहित, विराट कोहली आणि कुलदीप यादव यांचं आजच्या सामन्यात पुनरागमन झालं आहे. शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली आहे, तर अक्षर पटेल जखमी झाला आहे. तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी आणि हार्दिक पांड्या घरी गेले आहेत. रोहित म्हणाला, 'सध्या टीमला व्हायरल फिवरचा विळखा आहे. त्यामुळे यावेळी संघात बरीच अनिश्चितता आहे, ज्यात आपण काहीही करू शकत नाही."

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघ : 

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. 

टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिंस (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025Sushma Andhare on Holi | देवाभाऊ, देवतारी त्याला कोण मारी, अंधारेंकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget