एक्स्प्लोर

Morning Headlines 26th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Rahul Gandhi : राफेल विमान खरेदीवरुन पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप, राहुल गांधींच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी

मुंबई (Mumbai) : राफेल लढाऊ विमान खरेदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची मागील सुनावणी 2 ऑगस्ट रोजी झाली होती. त्यावेळी कोर्टाने पोलिसांना राहुल गांधी यांच्याविरोधात 26 सप्टेंबरपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. वाचा सविस्तर 

Rozgar Mela 2023 : तरुणांना सरकारी नोकरी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 51,000 तरुणांना मोठी भेट देणार आहेत. आज रोजगार मेळाव्यात (Rozgar Mela) पंतप्रधान मोदींच्या हस्ते 51,000 युवांना नियुक्ती पत्रांचं (Appointment Letter) वाटप करण्यात येणार आहे. आज मंगळवारी, 26 सप्टेंबर रोजी, सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (Video Conference) च्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रे सुपूर्द करतील. यावेळी पंतप्रधान मोदी तरुणांना (PM Modi Speech) संबोधित देखील करणार आहेत. देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळावा (Government Jobs) आयोजित करण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

MP BJP Candidates List : मध्यप्रदेशासाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, 3 केंद्रीय मंत्र्यासह 6 खासदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी

नवी दिल्ली : आगामी मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (MP Election 2023) भाजप (BJP) कडून उमेदवारांची दुसरी यादी (MP BJP Candidates List) जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 39 नावांचा समावेश आहे. वर्षाच्या शेवटी मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) निवडणुकीची (MP Election 2023) रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर 

भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा TOFEL कडे, नेमकं आहे काय? जाणून घ्या A to Z सर्व माहिती

TOEFL Higher Studies: सध्या अनेक भारतीय विद्यार्थी (Indian Student) परदेशात उच्च शिक्षणासाठी (Higher Education Abroad) TOEFL चा पर्याय निवडताना दिसतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी बारावी झाल्यानंतर शिक्षणासाठी परदेशात जातात. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. यावर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारनं काही माहिती दिली आहे. केंद्र सरकानं उत्तरात म्हटलं की, सध्या 12 लाख विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत, तर 2017 मध्ये ही संख्या 4 ते 5 लाखांवर पोहोचली होती. दरम्यान, परदेशात शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या TOFEL परीक्षेला बसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर 

डिमॅट अकाउंट होल्डर्सना SEBI कडून रिमाईंडर; 30 सप्टेंबरपर्यंत 'हे' काम नाही केलं तर, फ्रीज होणार अकाउंट

Demat Account: बाजार नियामक सेबीनं (SEBI) वैयक्तिक डिमॅट अकाउंट होल्डर्सना (Demat Account Holder) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) गुंतवणूकदारांसाठी नॉमिनी नोंदणी करण्याची, तसेच ही प्रोसेस पूर्ण करण्याची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. SEBI नं म्हटलं आहे की, जर दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर अकाउंट फ्रीज केलं जाईल. बाजार नियामक सेबीनं डिमॅट अकाउंट होल्डर्सना सप्टेंबरच्या अखेरीस नॉमिनी निवडण्याचा किंवा या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता. दरम्यान, यापूर्वी सेबीनं 31 मार्च 2023 पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. वाचा सविस्तर 

Jawan Box Office Collection : बॉक्स ऑफिसचा बादशाह एकच! शाहरुखच्या 'जवान'ने जगभरात केली 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई

Shah Rukh Khan Jawan Worldwide Box office Collection : बॉलिवूडचा बादशाह असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे. भारतात 500 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या सिनेमाने आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे शाहरुख खानचं बॉक्स ऑफिसचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. वाचा सविस्तर 

World cup 2023 : भारत वर्ल्डकप जिंकण्याची शक्यता किती? सुनंदन लेलेंचं सर्वात मोठं विश्लेषण

World Cup 2023 : विश्वचषकाआधी टीम इंडिया भन्नाट फॉर्मात परतली आहे. आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले. भारतीय संघ वनडेमध्ये अव्वल स्थानावर पोहचलाय. टीम इंडियाची कामगिरी सध्या भरारी घेणारी आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर  एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी यांनी मधली ओळमध्ये क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याशी चर्चा केली. सुनंदन लेले यांनी विविध विषयावर मत व्यक्त केले.. भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याची किती शक्यता? सूर्यकुमार यादवचा फॉर्म अन् बरेच काही... त्यांनी सांगितले. त्याशिवाय सुनंदन लेले यांनी विश्वचषकासाठी आपापला संघही निवडला... वाचा सविस्तर 

26th September In History : सदाबहार अभिनेता देवआनंद आणि आर्थिक उदारीकरणाचे जनक डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्मदिन, सचिनचा विक्रम; आज इतिहासात

मुंबई: सप्टेंबर महिन्यात अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडल्या आहेत. आजच्याच दिवशी थोर समाजसुधारक ईश्वर चंद्र विद्यासागर यांचा जन्म झाला होता. तसेच भारतीय आर्थिक उदारीकरणाचे जनक समजल्या जाणाऱ्या अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्मही 26 सप्टेंबर रोजीचा. सदाबहार अभिनेता देवआनंद यांचा जन्मही आजच्याच दिवशी. त्यामुळे 26 सप्टेंबर हा दिवस इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 26 September 2023: सिंह, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी मंगळवार भाग्याचा! आजचे राशीभविष्य

Horoscope Today 26 September 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, 26 सप्टेंबर 2023, मंगळवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज वृषभ राशीच्या लोकांना असा सल्ला दिला जात आहे की, तुमच्या कार्यक्षेत्रात कोणतीही जबाबदारी दिली असेल तर ती वेळेवर पूर्ण करावी. आपले काम इतर कोणावरही टाकू नये. बाकी राशींच्या लोकांसाठी मंगळवार काय घेऊन येतो? जाणून घ्या आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lok Sabha Parliament Session  : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, Rajnath Singh  यांचं भाषणRajya Sabha Parliament : राज्यसभेत अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ,खरगेंच्या पोस्टवरून गदारोळSunanda Pawar On Sharad Pawar :दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं; सुनंदा पवार यांचं वक्तव्य #abpमाझाAllu Arjun Arrested:पायात चप्पलही नाही, हाफ पँटवरच अल्लू अर्जुन पोलिसांच्या ताब्यात, EXCLUSIVE VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
Uddhav Thackeray : बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
Asaduddin Owaisi on Hindus in Bangladesh : असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला; परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
Embed widget