Rozgar Mela 2023 : तरुणांना सरकारी नोकरी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप
PM Modi Rozgar Mela : तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज रोजगार मेळाव्यात 51,000 नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 51,000 तरुणांना मोठी भेट देणार आहेत. आज रोजगार मेळाव्यात (Rozgar Mela) पंतप्रधान मोदींच्या हस्ते 51,000 युवांना नियुक्ती पत्रांचं (Appointment Letter) वाटप करण्यात येणार आहे. आज मंगळवारी, 26 सप्टेंबर रोजी, सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (Video Conference) च्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रे सुपूर्द करतील. यावेळी पंतप्रधान मोदी तरुणांना (PM Modi Speech) संबोधित देखील करणार आहेत. देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळावा (Government Jobs) आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात केंद्र सरकार (Central Government) आणि विविध राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकर भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. आज देशभरातील पोस्ट ऑफिस, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, संरक्षण मंत्रालयासह विविध मंत्रालये या विभागांमधील भरतीची नियुक्ती पत्रे पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने दिली माहिती
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) या संदर्भात माहिती देत सांगितलं आहे की, रोजगार मेळावा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी एक पाऊल आहे. रोजगार मेळा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल, असा सरकारल विश्वास आहे. रोजगार मेळावा तरुणांचे सक्षमीकरण होऊन राष्ट्रीय विकासासाठी त्यांचे योगदान लाभेल.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं की, नवनियुक्त नियुक्त उमेदवारांसाठी iGOT कर्मयोगी पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूल कर्मयोगी प्रारंभ याद्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळत आहे. यामुळे 'कुठेही कोणत्याही डिव्हाइस' द्वारे शिक्षण घेण्यासाठी 680 हून अधिक ई-लर्निंग कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :