Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लु अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थिएटरमध्ये न सांगता पोहोचल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

Allu Arjun Arrest : अभिनेता अल्लू अर्जुनला आज (13 डिसेंबर) हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अल्लूचा वैयक्तिक अंगरक्षक संतोष यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लु अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये न सांगता पोहोचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळे तेथे मोठी गर्दी झाली होती. यामध्ये अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापन अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
#BREAKING
— Nabila Jamal (@nabilajamal_) December 13, 2024
Allu Arjun's lawyers request Telangana HC for urgent hearing to quash the FIR against him
Advocates have requested court to issue orders preventing his arrest until Monday
It's a Friday, if court does not take up the matter today, it's likely @alluarjun could spend… https://t.co/8G5018j97o pic.twitter.com/uaukfFDmW8
अल्लू अर्जुनला त्याच्या घरातून ताब्यात घेतले
अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमनेही महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता. अभिनेत्याने मृत रेवतीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि त्यांची भेट घेतली. अभिनेत्याने 25 लाखांची मदत देण्याचे आश्वासनही दिले होते. अल्लू अर्जुनने या घटनेमुळे दु:ख झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी अल्लू अर्जुनला त्याच्या घरातून ताब्यात घेतले, त्यानंतर अटकेची कारवाई केली. पोलिसांनी सर्वप्रथम अल्लू अर्जुनला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आले. यादरम्यान त्याचे सासरे हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात पोहोचले. अल्लू अर्जुनविरुद्ध बीएनएस कलम 105, 118 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे अजामीनपात्र कलम आहे.
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
अल्लू अर्जुन 4 डिसेंबरला न सांगता संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आला होता. यामुळे चाहते अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी उत्सुक होते. त्याच्यासोबत मोठ्या संख्येने चाहत्यांनी थिएटरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थिएटरमध्ये मोठी गर्दी जमली आणि त्यानंतर लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. गर्दी कमी झाल्यानंतर गुदमरल्यामुळे बेशुद्ध झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यादरम्यान रुग्णालयात डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या























