Jawan Box Office Collection : बॉक्स ऑफिसचा बादशाह एकच! शाहरुखच्या 'जवान'ने जगभरात केली 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई
Jawan Movie : शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे.
![Jawan Box Office Collection : बॉक्स ऑफिसचा बादशाह एकच! शाहरुखच्या 'जवान'ने जगभरात केली 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई Shah Rukh Khan Jawan Worldwide Box office Collection SRK Movie grosses 1000 crore worldwide Atlee Kumar Film Know India Box office Collection 19 Days king khan upcoming movies Deepika Padukone vijay sethupathi nayanthara Bollywood Entertainment Jawan Box Office Collection : बॉक्स ऑफिसचा बादशाह एकच! शाहरुखच्या 'जवान'ने जगभरात केली 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/5068116f5a33b4e8c2e040d0af6b99ea1695692021615254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan Jawan Worldwide Box office Collection : बॉलिवूडचा बादशाह असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे. भारतात 500 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या सिनेमाने आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे शाहरुख खानचं बॉक्स ऑफिसचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत 'जवान' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता त्यांनी एक खास पोस्ट शेअर करत 'जवान'ने 1000 कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती दिली आहे. किंग खानच्या 'जवान' या सिनेमाने जगभरात 1004.92 कोटींचा गल्ला जमवला आहे. याआधी शाहरुखचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने जगभरात 1055 कोटींची कमाई केली. आता 'जवान' हा सिनेमा लवकरच 'पठाण'चा रेकॉर्ड मोडणार आहे.
View this post on Instagram
'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jawan Box Office Collection)
'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. एकीकडे या सिनेमावर प्रचंड टीका होत असताना दुसरीकडे मात्र शाहरुखचे चाहते 'जवान' हा सिनेमा पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'जवान' या सिनेमाने आतापर्यंत 566.08 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिला दिवस : 75 कोटी
दुसरा दिवस : 53.23 कोटी
तिसरा दिवस : 77.83 कोटी
चौथा दिवस : 80.1 कोटी
पाचवा दिवस : 32.92 कोटी
सहावा दिवस : 26 कोटी
सातवा दिवस : 23.2 कोटी
आठवा दिवस : 21.6 कोटी
नववा दिवस : 19.1 कोटी
दहावा दिवस : 31.8 कोटी
अकरावा दिवस : 36.85 कोटी
बारावा दिवस : 16.25 कोटी
तेरावा दिवस : 14.4 कोटी
चौदावा दिवस : 9.6 कोटी
पंधरावा दिवस : 8.1 कोटी
सोळावा दिवस : 7.6 कोटी
सतरावा दिवस : 12.25 कोटी
अठरावा दिवस : 14.95 कोटी
एकोणिसावा दिवस : 5.30 कोटी
एकूण कमाई : 566.08 कोटी
'जवान' या सिनेमात शाहरुख खानची वेगवेगळी रूप पाहायला मिळत आहेत. राजकारण आणि अनेक सामाजिक विषयांवर या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमात शाहरुखसह दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारादेखील मुख्य भूमिकेत आहे. तर रिद्धी डोंगरा, सान्या मल्होत्रा, लहर खान, प्रियामणी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची झलकही या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
शाहरुखचा 'डंकी' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! (Shah Rukh Khan Upcoming Movie)
शाहरुखच्या 'पठाण' आणि 'जवान' या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. आता किंग खानचा (King Khan) आगामी 'डंकी' (Dunky) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या 22 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात शाहरुख तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
संबंधित बातम्या
Kiran Mane : शाहरुख कधी कुणाला 'नमस्कार' करत नाही, 'सलाम' करतो; किरण मानेंची पोस्ट चर्चेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)