एक्स्प्लोर

Morning Headlines 20th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Maratha Reservation Special Assembly Session: मराठा आरक्षणाबाबत राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन; सगेसोयरे अधिसूचनेच्या मुद्द्यावर मात्र प्रश्नचिन्हच!

Maratha Reservation Special Assembly Session Today : मुंबई : राज्य विधिमंडळाचं (Maharashtra Assembly) आज विशेष अधिवेशन (Special Assembly Session) बोलावण्यात आलं आहे. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ बैठक होईल. या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजुरी मिळेल. या मंजुरीनंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्ताव मांडतील. प्रस्तावावर सर्वपक्षीय चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उत्तर देतील. वाचा सविस्तर 

Pune Crime News : पुणे ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट! आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड, मुंबई कनेक्शन आलं समोर

पुणे : पुणं  (Pune)   शहर ड्रग्सच्या (Pune drugs) विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं आहे. पुण्यात सापडलेले ड्रग्सची विक्री देशातील विविध भागात तसंच परदेशात होणार होती. पुण्यात काल (19 फेब्रुवारी) पकडण्यात आलं होतं. या ड्रग्सचं पुढे काय करणार होते, याची चौकशी करत असताना आंतरराष्ट्रीय आणि मुंबईचं ड्रग्स रॅकेट समोर आलं आहे. वाचा सविस्तर 

Tata Motors Journey: कधीकाळी गाशा गुंडाळण्याच्या तायरीत असणारी टाटांची कंपनी, आज कमावतेय बक्कळ नफा!

Ratan Tata Firm Tata Motors Journey: देशातील सर्वात जुन्या उद्योगपतींपैकी एक आणि देशभरातील कोट्यवधी लोकांचा विश्वास गाठीशी असलेला उद्योग समूह म्हणजे, टाटा ग्रुप (TATA Group). टाटा आणि विश्वास असं एक अतूट नातं निर्माण झालं आहे. अशातच टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्स (TATA Motors) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे, टाटा मोटर्सचे शेअर्स. टाटा मोटर्सचे शेअर्स सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. गेल्या वर्षभरातच शेअर्सनी गुंतवणुकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. गुंतवणूकदारांना थोडा थोडका नाहीतर तब्बल 110 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. 2020 पासूनचा कोरोना कालावधी बघितला तर या टाटाच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचं नशीब बदलण्याचं काम केलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वाचा सविस्तर

एक मिनिटांत कोट्यवधी, एका आठवड्यात अब्जावधी; एलन मस्क कमाईत अंबानी-अदानींनाही टाकतात मागे!

Elon Musk Minute Income Business: एलन मस्क (Elon Musk) म्हणजे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावामध्ये समाविष्ठ होणारं नाव. एलन मस्क (Elon Musk Net Worth)  यांच्या कमाईबाबत एक रंजक अहवाल समोर आला आहे. यामध्ये त्यांच्या आठवडाभराच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. फिनबोल्डच्या मते, टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Tesla CEO Elon Musk) प्रत्येक मिनिटाला सुमारे 6,887 डॉलर (सुमारे 5,72,000 रुपये) कमावतात. एका तासात त्यांची कमाई 4,13,220 डॉलर म्हणजे, अंदाजे 3 कोटी 43 लाख रुपये आहे, तर एका आठवड्यात एलन मस्क अंदाजे 9,917,280 किंवा 82,00,00,000 रुपये कमावतात... वाचा सविस्तर 

Horoscope Today 20 February 2024 : आजचा मंगळवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 20 February 2024 : आजचा दिवस, मंगळवार 20 फेब्रुवारी 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारणAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'पतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr. Prakash Koyade यांच्याशी गप्पाABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Pune: पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.