एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today 20 February 2024 : आजचा मंगळवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 20 February 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 20 February 2024 : आजचा दिवस, मंगळवार 20 फेब्रुवारी 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today)

आज तुम्हाला नवीन लोक भेटू शकतात, ज्यांच्याशी तुमचं चांगलं नातं बनेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा लागेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज आरोग्याची विशेष काळजी घ्या.  उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून पैसे मिळू शकतात. काही लोकांना पैशांसंबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जमीन आणि वाहन खरेदीचा निर्णय आज तुम्ही घेऊ शकता.

वृषभ (Taurus Horoscope Vrushabh Rashi Today)

तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. वृषभ राशीच्या अविवाहित व्यक्तींना आज विशेष व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला प्रपोज करू शकता, तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळेल. व्यावसायिक जीवनात तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल, आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. नोकरीत तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुम्ही अंतिम मुदतीपूर्वी सर्व कामं पूर्ण करू शकाल. आर्थिक बाबतीत सावध राहा. उत्पन्नाच्या अनेक स्त्रोतांमधून आर्थिक लाभ होईल आणि आजचा दिवस आनंद आणि समृद्धीचा असेल.

मिथुन (Gemini Horoscope Mitun Rashi Today)

आजचा तुमचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी अनेक रोमांचक बदल घडतील. सहकारी आणि वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही डोकम वापरुन काम कराल आणि नाविन्यपूर्ण कल्पना सर्वांना सुचवाल. गुंतवणूक करण्याचा निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवा. अविवाहित लोक आकर्षक व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतात. जे लोक आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना नात्यात आणखी सलोखा जाणवेल. तुमच्या जोडीदाराशी योग्य संवाद साधा. तुमच्या जोडीदारासोबत तुमची स्वप्नं शेअर करा. परस्पर समन्वयाने तुम्ही दोघेही तुमचं भविष्य उज्वल करू शकता.

कर्क (Cancer Horoscope Kark Rashi Today)

आजचा दिवस जबाबदाऱ्यांनी भरलेला असेल. तुमच्या ऑफिसमध्ये इतरांच्या कामाची जबाबदारीही तुमच्यावर येऊ शकते. भागीदारी व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या दिनक्रमात काही बदल केल्यास त्यांना फायदा होईल. आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहा. तुमच्या लव्ह लाईफमध्ये आज बरेच बदल होताना दिसतील.

सिंह (Leo Horoscope Sinha Rashi Today)

आजचा दिवस एकूणच चांगला जाईल. नोकरीत अधिकाऱ्यांशी संवाद साधताना लक्ष केंद्रित करा. खाद्यपदार्थ व्यवसायिकांचा चांगला फायदा होईल, तुमचे ग्राहक वाढतील. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. गरम पाणी आणि गरम अन्नाचे सेवन आरोग्यासाठी चांगले राहील. तुमच्या जास्त खर्चावर नियंत्रण ठेवा.  तुमचा आजचा दिवस आत्मविश्वास आणि सकारात्मकतेने भरलेला असेल.

कन्या (Virgo Horoscope Kanya Rashi Today)

तुमचा आजचा दिवस आळस सोडण्याचा आहे. आळशीपणामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत अधिका-यांकडून टोमणे ऐकावे लागू शकतात. कामाची ठिकाणी येणाऱ्या आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागेल. व्यवसाय वाढवण्याच्या नादात अनावश्यक ताण घेऊ नका, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं. मोठ्या भावंडांकडून प्रेम आणि मार्गदर्शन मिळेल. आज तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल.

तूळ (Libra Horoscope Tula Rashi Today)

तुमचा आजचा दिवस छान जाईल. नोकरीच्या क्षेत्रात तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. तुम्ही तुमच्या कामासाठी तुमचे 100 टक्के द्याल, जे भविष्यात चांगले परिणाम देईल. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. तरुणांना मित्र आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. काही लोक आज कार खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्याने तुम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता.

वृश्चिक (Scorpio Horoscope Vruschik Rashi Today)

नोकरीत तुमच्या पूर्वनियोजित कामात आज काही बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसाय चालवताना एखाद्याचा अपमान करू नका, अन्यथा वादाला तोंड फुटेल आणि याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर होईल. एखादा व्यक्ती तुमची पोलिसांत तक्रार करू शकतो. तरुणांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवा. घरगुती समस्यांमुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. आरोग्याविषयी बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला एलर्जीची समस्या जाणवू शकते. अनपेक्षित धनलाभ संभव आहे.

धनु (Sagittarius Horoscope Dhanu Rashi Today)

तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं. नोकरीत हुशारीने काम करा, तेथील राजकारणात पडू नका. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल, तुम्हाला व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता आहे. तरुणांनी रागावणं टाळावं, अन्यथा गोष्टी बिघडू शकतात. बाहेरचे पदार्थ खाणं टाळा, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं. लव्ह लाईफमध्ये तुम्हाला संयम राखण्याची गरज आहे, अन्यथा वाद वाढू शकतात.

मकर (Capricorn Horoscope Makar Rashi Today)

तुमच्या ऑफिसमध्ये गेल्यावर आज काय काय काम करायचं आहे याची आधीच योजना करा, तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांनी त्यांचं नेटवर्क वाढवण्यावर भर दिला पाहिजे. तरुणांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे खांदे दुखू शकतात. लव्ह लाईफमध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. पैसा जपून खर्च करा, या आठवड्यात तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते.

कुंभ (Aquarius Horoscope Kumbha Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीत तुम्हाला आज उच्च अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करावं लागेल. प्रॉपर्टीचे व्यवहार करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. आजचा दिवस तणावमुक्त असेल. पालकांसोबत वेळ घालवला तर तुम्हाला अधिक बरं वाटेल. आज वाहन नीट चालवा, वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे. तुम्ही ध्यान करू शकता किंवा स्वत:ची डायरी लिहू शकता. आज तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी मिळतील.

मीन (Pisces Horoscope Meen Rashi Today)

नोकरीत तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या संस्थांमध्ये काम करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. व्यवसायात पैसे गुंतवणं टाळा, आजचा दिवस चांगला नाही. तरुणांनी आपलं काम आज शांत मनाने करावं. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. आज तुमचा मानसिक तणाव दूर होईल. तुमचं अडकलेलं काही मोठं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज सोन्यात गुंतवणूक करू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani 2024 : शनीचा कुंभ राशीत होणार उदय; 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, आर्थिक लाभाचेही योग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP MajhaST Bus Ticket Price increase | एसटीचा तब्बल 18 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकीट महागणारMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar On CM : भाजपचा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असतील - अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Embed widget