एक्स्प्लोर

Morning Headline 1st March 2024 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाची रिमझिम, काही भागात तापमानात वाढ! पुढील 24 तास पावसाचा अंदाज कायम

Weather Update Today : राज्यासह देशात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता (Unseasonal Rain) आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मुंबईसह राज्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुंबई, नवी मुंबईसह राज्यात अनेक भागात रिमझिम पाऊस झाला आहे. मुंबईत मध्यरात्री दादर, परेल भागात पावसाच्या तुरळक सरी पाहायला मिळाल्या. तर नवी मुंबईत आज पहाटे पावसाची रिमझिम सुरु होती. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशात आज पावसाची शक्यता कायम आहे. वाचा सविस्तर...

आजपासून GST ते LPG 'हे' 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर ताण पडणार का?

Changes in March : आजपासून नवीन महिना म्हणजे मार्च (March) सुरू झाला आहे. मार्च सुरु होताच, अनेक मोठे बदल दिसून येत आहेत,  ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. दर महिन्याला अनेक बदल पाहायला मिळतात. पण, मार्च महिना विशेष आहे कारण हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे, त्यामुळे प्रत्येकाला पैशाशी संबंधित अनेक कामे पूर्ण करावी लागतात. यावेळी जीएसटी नियमांपासून एलपीजी आणि फास्टॅगमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. वाचा सविस्तर...

MVA Candidate List : लोकसभेसाठी मविआची संभाव्य उमेदवारांची यादी समोर; शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता

Lok Sabha Election 2024 MVA Candidate List : लोकसभेसाठी मविआची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, अमोल कीर्तीकरांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. काँग्रेसकडून नाना पटोले, रविंद्र धनगेकरांना संधी मिळण्याचं बोललं जात आहे. वाचा सविस्तर...

दिलासादायक! तिसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर, GDP वाढीच्या दरात नेमकी वाढ किती? 

India GDP Growth: सरकारने चालू आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीचे GDP वाढी संदर्भातील आकडे जाहीर केले आहेत. निवडणुकीपूर्वी जीडीपीच्या दरात चांगली वाढ (Growth rate) झाल्याचे दिसून आले आहे. ही वाढ 8.4 टक्क्यांची आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत नोंदवलेल्या 4.3 टक्क्यांच्या वाढीच्या दरापेक्षा हा दर खूप जास्त आहे. हा विकासदर केवळ अर्थव्यवस्थेसाठी आणि सरकारसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. वाचा सविस्तर...

Bangladesh Fire : ...आणि बघता बघता संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये आग पसरली, ढाका मध्ये इमारतीला भीषण आग, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू

Bangladesh Fire : बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) येथील सात मजली इमारतीत गुरुवारी रात्री आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली आणि काही वेळातच ती वरच्या मजल्यांवर वेगाने पसरू लागली. वाचा सविस्तर...

श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांच्यासाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद?

Shreyas Iyer, Ishan Kishan BCCI contracts : स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि शानदार यष्टीरक्षक ईशान किशन (Ishan Kishan) यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) 28 फेब्रुवारी रोजी मोठा धक्का दिला. या दोघांनाही बीसीसीआयने (BCCI) वार्षिक करारातून वगळलं. त्यानंतर अय्यर आणि किशन याचं टीम इंडियातील रस्ते बंद झाल्याची चर्चा सुरु झाली. पण या दोघांचे टीम इंडियाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. टीम इंडियात परत येण्यासाठी या दोघांना संधी असतात. वाचा सविस्तर...

1st March In History : इंग्रजांनी सिंहगड ताब्यात घेतला, रौलेट अॅक्ट विरोधात गांधीजींचे आंदोलन, वसंतदादा पाटलांचे निधन; आज इतिहासात

1st March In History : आजचा दिवस भारतीयांच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहासासाठी महत्त्वाचा दिवस आहे. शिवरायांच्या स्वराज्यात ज्या किल्ल्याला अतिशय महत्त्वाचं स्थान होतं, तो सिंहगड किल्ला इंग्रजांनी पेशव्यांकडून जिंकून घेतला. बाजीराव पेशव्याचा पाडाव केल्यानंतर, 1818 साली इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. याशिवाय इतिहासात घडलेल्या इतर काही महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे वाचा सविस्तर...

Horoscope 1st March 2024 : कसा जाईल मार्च महिन्याचा पहिला दिवस? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

Horoscope 1st March 2024 :  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget