एक्स्प्लोर

1st March In History : इंग्रजांनी सिंहगड ताब्यात घेतला, रौलेट अॅक्ट विरोधात गांधीजींचे आंदोलन, वसंतदादा पाटलांचे निधन; आज इतिहासात

1st March In History : इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना दडपण्यासाठी रौलेट कायदा लागू केला. त्या कायद्याविरोधात महात्मा गांधींनी आजच्याच दिवशी सत्याग्रह सुरू केला. 

1st March In History : आजचा दिवस भारतीयांच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहासासाठी महत्त्वाचा दिवस आहे. शिवरायांच्या स्वराज्यात ज्या किल्ल्याला अतिशय महत्त्वाचं स्थान होतं, तो सिंहगड किल्ला इंग्रजांनी पेशव्यांकडून जिंकून घेतला. बाजीराव पेशव्याचा पाडाव केल्यानंतर, 1818 साली इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. याशिवाय इतिहासात घडलेल्या इतर काही महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे,

जागतिक नागरी संरक्षण दिन (World Civil Defence Day )

जागतिक नागरी संरक्षण दिन दरवर्षी 1 मार्च रोजी साजरा केला जातो. जगातील नागरी संरक्षण, नागरी संरक्षण, नागरी सुरक्षेबाबत लोकांना जागरुक करणे हा त्याचा उद्देश आहे. जॉर्जेस सेंट-पॉल, एक फ्रेंच सर्जन जनरल, यांनी 1931 मध्ये असोसिएशन डेस लक्से डी जिनीव्हची स्थापना केली. त्यातून इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर सिव्हिल डिफेन्स (ICDO) ही संस्था स्थापन झाली. अपघात किंवा आपत्तींच्या प्रसंगी नागरी संरक्षण आणि सज्जता आणि प्रतिबंध आणि स्व-संरक्षण उपायांबद्दल जागरुकता वाढवणे, स्वसंरक्षणासाठी लोकांमध्ये जागृती आणणे आदी उद्दिष्ट्य आहेत. नागरी संरक्षणाचे महत्व लक्षात आणून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

1818: सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात सिंहगडाचे एक वेगळे महत्त्व आहे. हा किल्ला पेशवाईअखेरपर्यंत पेशव्यांच्या ताब्यात होता. त्याचा उपयोग मुख्यत्वे एक सुरक्षित स्थान व कैदी ठेवण्यासाठी होत असे. निजामाने 1763 मध्ये पुण्यावर स्वारी केली तेव्हा पेशवे घराण्यातील सर्वांनी सिंहगडावर आसरा घेतला होता. दुसऱ्या बाजीरावाविरुद्ध इंग्रजांनी युद्ध सुरु करताच त्याने आपली संपत्ती व पत्नी राधाबाई यांस सुरक्षिततेसाठी सिंहगडावर ठेवले होते. इंग्रजांनी बाजीरावाचा पाडाव केल्यानंतर 1818 मध्ये प्रिटझ्लरच्या नेतृत्वाखाली सिंहगड जिंकला. त्यांनी तेथील संपत्ती लुटली तसेच तटबंदी पाडली. स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.

1919 : रौलेट कायद्याविरोधात महात्मा गांधी यांचा सत्याग्रह

रौलेट कायदा हा काळा कायदा म्हणूनही ओळखला जातो. 19 मार्च 1919 रोजी ब्रिटीश सरकारने भारतात उदयास येत असलेल्या राष्ट्रीय चळवळीला चिरडून टाकण्याच्या उद्देशाने केलेला हा कायदा होता. हा कायदा सिडनी रॉलट यांच्या अध्यक्षतेखालील राजद्रोह समितीच्या शिफारशींच्या आधारे करण्यात आला होता. या कायद्याविरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रह सुरू केला होता. 

1922 : नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म (Nanasaheb Dharmadhikari) 

समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरुपणकार असलेले नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचा रेवदंडा अलिबाग येथे जन्म. अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत त्यांनी कार्य केले. 2008 मध्ये त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण या महाराष्ट्राच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

1944 : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म

पश्चिम बंगालचे सातवे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म. ते 2000 ते 2011 या दरम्यानच्या कालावधीत ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. 2011 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भारतीय डाव्या चळवळीतील ते प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

1983 : भारतीय बॉक्सर मेरी कोमचा जन्म

भारताची महिला बॉक्सर मेरी कोमचा आज जन्म झाला. मेरी कोमने 8 वेळेस वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धा जिंकली आहे. त्याशिवाय, भारतासाठी तिने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकही पटकावले आहे. भारतात महिला बॉक्सिंगसाठी मेरी कोम एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे. 

1989 : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे निधन (Vasantdada Patil)

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे अशी वसंतदादा पाटील यांची ओळख आहे. वसंतदादा पाटील हे 1977 ते 1985 या कालावधीत चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. वसंतदादा पाटील हे लहानपणापासून स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. 1940 नंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात जोमाने सहभाग घेतला. त्यांनी तीन वर्षे कारावासही भोगला होता. सातारा-सांगली या भागांत दादा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते.

1994 : दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचे निधन (Manmohan Desai)

भारतीय सिनेसृष्टीत आपली वेगळी छाप सोडणारे दिग्दर्शक, निर्माते  मनमोहन देसाई यांचा आज स्मृती दिन. मनमोहन देसाई यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन, निर्मिती केली. मनमोहन देसाई यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 'छलिया' चित्रपटातून केली. मनमोहन देसाई यांनी ब्लफ मास्टर, किस्मत, रोटी, परवरिश, धरमवीर, अमर-अकबर-अँथोनी, नसीब, सुहाग, गंगा जमुना सरस्वती आदी गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन-निर्मिती केली. 

2017 : तारक मेहता यांचे निधन (Taarak Mehta)

गुजराती विनोदी लेखक, नाटककार तारक मेहता यांचे निधन. त्यांनी गुजराती भाषेत विनोदी नाटकांचे लेखन केले. त्याशिवाय इतर भाषांमधील चांगली नाटकेही गुजराती रंगमंचावर आणली. ' तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिका त्यांच्या कथेवर आधारीत आहे. त्यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

ही बातमी वाचा: 



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget