Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाची रिमझिम, काही भागात तापमानात वाढ! पुढील 24 तास पावसाचा अंदाज कायम
Unseasonal Rain : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशात आज पावसाची शक्यता कायम आहे. पुढील 24 तासांत अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आयएमडीने वापरला आहे.
Weather Update Today : राज्यासह देशात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता (Unseasonal Rain) आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मुंबईसह राज्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुंबई, नवी मुंबईसह राज्यात अनेक भागात रिमझिम पाऊस झाला आहे. मुंबईत मध्यरात्री दादर, परेल भागात पावसाच्या तुरळक सरी पाहायला मिळाल्या. तर नवी मुंबईत आज पहाटे पावसाची रिमझिम सुरु होती. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशात आज पावसाची शक्यता कायम आहे.
आजचं हवामान कसं असेल?
पुढील 24 तासांत अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आयएमडीने वापरला आहे. ठाण्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यातील घोडबंदर, वागळे इस्टेट कळवा या ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली आहे. भारतील हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आजपासून 1 मार्चपर्यंत अनेक भागात पावसाची रिमझिम दिसणार आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पंजाबमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवार आणि शनिवारी हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरसह उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, असा आयएमडीचा (IMD) अंदाज आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, रविवारी आणि सोमवारी उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. हिमाचल प्रदेशात 1 आणि 2 मार्च रोजी गारपीट होण्याची शक्यता आहे.
पुढील 24 तासात पावसाचा अंदाज
आयएमडीच्या अंदाजानुसार, मराठवाडासह विदर्भात पुन्हा पावसाचा हवामान विभागाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. गारपिटीमुळे विदर्भात पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पुढील 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. नाशिक, बुलढाणा, जालना, हिंगोली भागात गेल्या दोन दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान
हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये कापून टाकलेल्या गव्हाच्या पेंड्या पूर्णपणे भिजून गेले आहेत त्यामुळे गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, ज्वारी यासह संत्रे, मोसंबी या फळबागांना सुद्धा या पावसाचा फटका बसला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :