एक्स्प्लोर

Morning Headlines 17th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा प्रारंभ होणार, योजनेत 'या'  18 पारंपारिक व्यवसायांचा समावेश 

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज (17 सप्टेंबर 2023) नवी दिल्लीत 'पीएम-विश्वकर्मा' (PM Vishwakarma scheme) या केंद्रीय क्षेत्र योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.  पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील निपुण कारागिरांना ओळख आणि सर्वांगीण मदत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, निर्मिती आणि व्याप्ती वाढवणं, त्यांना एमएसएमई मूल्य साखळींमध्ये सामावून घेणं हा या योजनेचा उद्देश आहे. वाचा सविस्तर 

PM Modi Birthday: घ्यायचा होता संन्यास, पण नशिबात होतं काही वेगळं; 'असा' होता मोदींचा CM पासून PM पदापर्यंतचा रोमांचक प्रवास

PM Modi Birthday: आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा 73 वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात जय्यत तयारी सुरू आहे, भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, एका सामान्य जन्मलेल्या सामान्य माणसाचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास अत्यंत अनोखा होता, यातील काही तथ्य आज जाणून घेऊया. पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्रिपद ते पंतप्रधानपदापर्यंत मजल कशी मारली? माहीत आहे का? पंतप्रधान मोदींना आयुष्यात नक्की बनायचं काय होतं हेही क्वचितच कुणाला तरी माहीत असेल. वाचा सविस्तर 

Diamond League 2023: केवळ 0.44 सेंटीमीटरमुळं नीरज चोप्राचं सुवर्णपदक हुकलं; रौप्यपदकाला गवसणी

Neeraj Chopra In Diamond League Final: डायमंड लीग 2023 (Diamond League 2023) च्या अंतिम फेरीत नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) रौप्यपदक पटकावलं आहे. केवळ 0.44 सेंटीमीटरच्या फरकानं नीरज चोप्राचं सुवर्णपदक हुकलं अन् नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर चेक रिपब्लिकच्या जाकुब वादलेचनं सुवर्णपदक जिंकलं. नीरज चोप्रानं दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर भालाफेक केली. अंतिम फेरीतील नीरज चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी होती, परंतु नीरज 83.80 मीटरच्या पुढे जाऊ शकला नाही. अशातच चेक रिपब्लिकच्या जाकुब वादलेचनं शेवटच्या प्रयत्नात 84.27 मीटर भालाफेक केली आणि जाकुब वादलेचनं सुवर्णपदक आपल्या नावे केलं. वाचा सविस्तर 

Weather Update : राजस्थानसह मध्य प्रदेशात जोरदार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत; आज 'या' राज्यात पावसाचा इशारा

Weather Update News: देशातील काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. तर काही राज्यामध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) राजस्थानमध्ये (Rajasthan) सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसानंतर परिस्थिती बिकट झाली असून, काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आजही काही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

Tata Sons IPO: टाटांचा नवा IPO लवकरत बाजारात येणार, शेअर मार्केटचे सर्व रेकॉर्ड मोडणार?

India's Biggest IPO: टाटा (TATA) म्हणजे विश्वास... हे समिकरण संपूर्ण देशभरात दृढ झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टाटा समूह (TATA Group) देशभरात सक्रिय आहे. देशभरातील सर्वसामान्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे, टाटा. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशात शोधूनही कोणी असं सापडणार नाही, ज्यानं आपल्या आयुष्यात एकदाही टाटा समुहाचं काही वापरलेलं नसेल.  रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणार्‍या मिठापासून ते अनेक मोठी कामं हाताळण्यासाठी वापरली जाणारी साधनं, तर अगदी सॉफ्टवेअरपर्यंत यांसारख्या अनेक गोष्टींवर टाटा समुहाची मोहोर दिसते. टाटानं आपल्या शंभर वर्षांहून अधिक जुन्या इतिहासात अनेक मोठी कामगिरी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता हा समूह शेअर बाजारात असा विक्रम रचणार आहे, जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. वाचा सविस्तर 

VSI : गुजरातमध्ये उभारणार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं उपकेंद्र, शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

Vasantdada Sugar Institute : गुजरातमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (Vasantdada Sugar Institute) नवीन उपकेंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  गुजरात आणि खानदेशच्या सीमावर्ती भागातील साखर उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (VSI) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 17 September 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नयेत; जाणून घ्या सर्व राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 17 September 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असणार आहे. तर, काही राशींनी काळजी घेणं गरजेचं आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा रविवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशीबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

Weekly Horoscope 18 September to 24 September 2023 : येणारा आठवडा 'या' राशींसाठी घेऊन येणार सुवर्णसंधी; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 18 September to 24 September 2023 : सप्टेंबर महिन्यातला चौथा आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. धनु, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनेक चांगल्या संधी घेऊन येणार आहे. हा आठवडा ज्योतिषाच्या दृष्टीने विशेष आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहे. चला जाणून घेऊया सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget