एक्स्प्लोर

Tata Sons IPO: टाटांचा नवा IPO लवकरत बाजारात येणार, शेअर मार्केटचे सर्व रेकॉर्ड मोडणार?

India's Biggest IPO: टाटा समूहाची गणना भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांमध्ये केली जाते. टाटा समुहाचा विस्तार फार मोठा आहे.

India's Biggest IPO: टाटा (TATA) म्हणजे विश्वास... हे समिकरण संपूर्ण देशभरात दृढ झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टाटा समूह (TATA Group) देशभरात सक्रिय आहे. देशभरातील सर्वसामान्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे, टाटा. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशात शोधूनही कोणी असं सापडणार नाही, ज्यानं आपल्या आयुष्यात एकदाही टाटा समुहाचं काही वापरलेलं नसेल.  रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणार्‍या मिठापासून ते अनेक मोठी कामं हाताळण्यासाठी वापरली जाणारी साधनं, तर अगदी सॉफ्टवेअरपर्यंत यांसारख्या अनेक गोष्टींवर टाटा समुहाची मोहोर दिसते. टाटानं आपल्या शंभर वर्षांहून अधिक जुन्या इतिहासात अनेक मोठी कामगिरी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता हा समूह शेअर बाजारात असा विक्रम रचणार आहे, जो यापूर्वी कधीही झाला नव्हता.

19 वर्षापूर्वी आलेला IPO 

टाटा समूह लवकरच आपला आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. टाटा समुहाचे अनेक शेअर्स आधीच शेअर बाजारात लिस्टेड आहेत. यापूर्वी साधारणतः दोन दशकांपूर्वी टाटा समुहाचा आयपीओ बाजारात आला होता. त्यावेळी टाटा समुहाची आयटी कंपनी TCS बाजारात आली होती. त्यानंतर आता टाटा समूह नव्या आयपीओसह बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. सध्या टाटा टेक्नॉलॉजीजच्या नावानं अनेक महिन्यांपासून टाटाच्या आयपीओची चर्चा सुरू आहे. दरम्यान, अलीकडील नियामक बदलांमुळे टाटा समूहाच्या आणखी एका आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे.

रिझर्व्ह बँकेमुळे टाटा नवा IPO आणणार 

आता टाटा समुहाकडून येणारा नवा IPO हा समुहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचा असणार आहे. रिझर्व्ह बँकेनं नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांनुसार, रिझर्व्ह बँकेनं टाटा सन्सला अप्पर लेयरवरील NBFC च्या कॅटेगरीत टाकलं आहे. टाटा सन्स कॅटेगरायजेशन टाळण्यासाठी पर्याय शोधत आहे. या प्रकरणात सर्वात सोपा पर्याय म्हणजे, बाजारात लिस्ट होणं. टाटा सन्सनं बाजारात सूचिबद्ध होण्याचा निर्णय घेतल्यास, त्यासाठी आयपीओ लॉन्च करावा लागेल.

टाटांच्या आयपीओचं साईज काय असेल? 

सध्याच्या नियमांनुसार, टाटा सन्सला बाजारात लिस्टेड होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी आहे. म्हणजे, टाटा सन्सला सप्टेंबर 2025 पूर्वी आयपीओ आणावा लागेल. सध्या टाटा सन्सची वॅल्यू अंदाजे 11 लाख कोटी रुपये आहे. आयपीओ आल्यास टाटा ट्रस्टसह टाटा सन्सच्या विविध भागधारकांना त्यांचा हिस्सा 5 टक्क्यांनी कमी करावा लागेल. सध्या टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची सर्वाधिक 66 टक्के भागीदारी आहे. त्यानुसार कॅलक्युलेट केल्यास 5 टक्के होल्डिंगसह IPO चं मूल्य सुमारे 55 हजार कोटी रुपये होतं. 

LIC च्या नावे हा रेकॉर्ड 

आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत एवढ्या मोठ्या आकाराचा एकही IPO आलेला नाही. भारतीय बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO चा विक्रम सध्या सरकारी विमा कंपनी LIC कडे आहे. LIC नं गेल्या वर्षी 21 हजार कोटी रुपयांचा IPO आणला होता, जो भारतीय बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO होता. याआधी हा विक्रम पेटीएमच्या नावावर होता.

भारतीय बाजारातील सर्वात मोठे IPO 

LIC : 2022: 21 हजार कोटी रुपये 
पेटीएम (One97 Communications) : 2021: 18,300 कोटी रुपये
कोल इंडिया : 2010: 15,200 कोटी रुपये
रिलायंस पावर : 2008: 11,700 कोटी रुपये
जीआईसी : 2017: 11,257 कोटी रुपये

टाटा समुहाच्या सध्याच्या शेअर्सची संपूर्ण यादी 

टाटा कंसल्टंसी लिमिटेड (Tata Consultancy Services Limited)
टाटा स्टील (Tata Steel Limited)
टाटा मोटर्स (Tata Motors Limited)
टाइटन (Titan Company Limited)
टाटा केमिकल्स (Tata Chemicals Limited)
टाटा पावर (The Tata Power Company Limited)
इंडियन होटल्स कंपनी (The Indian Hotels Company Limited)
टाटा कंज्यूमर प्रोडक्ट्स (Tata Consumer Products Limited)
टाटा कम्यूनिकेशंस (Tata Communications Limited)
वोल्टास (Voltas Limited)
ट्रेंट (Trent Limited)
टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्स (Tata Steel Long Products Limited)
टाटा इन्वेस्टमेंट कॉरपोरेशन (Tata Investment Corporation Limited)
टाटा मेटालिक्स (Tata Metaliks Limited)
टाटा एलक्सी (Tata Elxsi Limited)
नेल्को (Nelco Limited)
टाटा कॉफी (Tata Coffee Limited)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget