ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
किसन महाराज साखरे यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. तसेच आळंदी, देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले.
पुणे : संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार किसन महाराज (Kisan maharaj) साखरे यांचे निधन झाले. डॉ. किसन महाराज साखरे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने महाराज साखरे यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यांतच त्यांची प्रणज्योत मालवल्याच माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आज मोठ्या गर्दीत त्यांच्यावर आळंदी (Alandi) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. किसन महाराज यांचे थोरले सुपुत्र यशोधन साखरे यांनी साखरे महाराजांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी, त्यांचा भक्त परिवार आणि अनुयायी वर्ग शोकाकूल झाला होता.
किसन महाराज साखरे यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. तसेच आळंदी, देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले. याशिवाय ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली असून त्यांची 115 पेक्षा अधिक पुस्तक प्रकाशित झाली आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर 14 वर्षे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले
महाराजांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भाविकांनी व अनुयायांनी आळंदीत मोठी गर्दी केली होती. आळंदीतून प्रदक्षिणा मार्गाने वैकुंठवासी किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवाची काढण्यात आली, या अंत्ययात्रेला शोकाकूल वातावरण मोठा जनसागर दिसून आला. आळंदीतील साधकाश्रम येथे त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजनाथ यांच्यासह अनेक महाराज व भक्तगणांनी साखरे महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून श्रद्धांजली
संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ.किसन महाराज साखरे यांच्या दुःखद निधनाने वारकरी संप्रदायाचा वारसा चालविणाऱ्या आध्यात्मिक परंपरेची मोठी हानी झाली आहे. साखरे महाराजांनी संस्कृत आणि मराठी भाषेतून 115 ग्रंथ लिहून साहित्यविश्वात मोलाची भर घातली आहे. सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद, सोहम योग, ज्ञानेश्वर महाराज चरित्र आदी ग्रंथसंपदेतून त्यांनी संत साहित्य सामान्यांपर्यंत पोहोचविले. 500 ताम्रपटांवर ज्ञानेश्वरी प्रकाशित करून आपल्या अभिजात परंपरेला वैभवान्वित केले. त्यांच्या थोर कार्यास विनम्र अभिवादन. या पुण्यात्म्यास सद्गती प्राप्त व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना, अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली.
हेही वाचा
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य