एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Morning Headlines 16th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

शामीच सिकंदर, विराट अन् अय्यर ठरले न्यूझीलंडसाठी 'ताप'; टीम इंडियाकडून किवींचं आव्हान पार, लावली रेकॉर्ड्सची माळ

India vs New Zealand Semi Final 1st 2023: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) दणक्यात फायनल्समध्ये (ICC World Cup 2023 Final) प्रवेश केला आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup) मध्ये  झंझावाती कामगिरी करत टीम इंडियानं (Team India) फायनलपर्यंतची मजल मारली आहे. टीम इंडियानं बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमी फायनल्सचा सामना खेळला आणि तब्बल 70 धावांनी किवी संघांचा धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय क्रिकेट संघानं न्यूझीलंडकडून 2019 मँचेस्टरचा बदलाही घेतला आहे. खरं तर 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकाच्या सेमीफायनल्समध्ये किवी संघाकडून पराभूत झाला होता. आता रोहितसेनेनं त्याच पराभवाचा बदला किवींकडून घेतला आहे. वाचा सविस्तर 

PM Modi on Mohammed Shami: वेल प्लेड शामी! मोहम्मद शामीच्या गोलंदाजीची पंतप्रधान मोदींनाही भूरळ, ट्वीट करत म्हणाले...

ICC World Cup Semi Final 2023, Mohammed Shami: टीम इंडियानं (Team India) सेमीफायनलमध्ये (ICC World Cup 2023) न्यूझीलंडचा (New Zealand) 70 धावांनी धुव्वा उडवत विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. या सामन्यात मोहम्मद शामीनं (Mohammed Shami) शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स चटकावल्या. फक्त देशच नाही अख्खं जग शामीच्या गोलंदाजीवर फिदा झालंय, अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही शामीच्या गोलंदाजीची भूरळ पडली आहे. शामीच्या गोलंदाजीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी भरभरून कौतूक केलं आहे. वाचा सविस्तर 

AUS vs SA Semifinal: आफ्रिका-ऑस्ट्रेलियामध्ये उपांत्य फेरीचा दुसरा सामना, कोण मारणार बाजी?

AUS vs SA Playing 11, Pitch Report & Weather Forecast : विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिका संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जातेय. डेविड वॉर्नर, मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड सध्या भन्नाट फॉर्मात आहेत. त्याशिवाय गोलंदाजीत पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सच्या जोडीला एॅडम झम्पा आहे. दुसरीकडे आफ्रिकाच्या संघामध्ये सातत्य दिसत नाही. क्विंटन डिकॉक फॉर्मात आहे. पण त्याला इतर फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळत नाही. एडन मार्करम, हेनरिक क्लासेन यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. गोलंदाजीतही कगीसो रबाडा, लुंगी एनगिडी यांच्या कामगिरीत सातत्य नाही. वाचा सविस्तर 

गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत; 40 तासांची झुंज ठरली अपयशी

Ratnagiri News: रत्नागिरीतील (Ratnagiri) गणपतीपुळे (Ganpatipule) समुद्रकिनारी आलेल्या बेबी व्हेल (Blue Whale) माशाचा अखेर मृत्यू झाला आहे. व्हेल माशाच्या पिल्लाला दोन दिवसांत जवळपास पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. दूर समुद्रात सोडलेला बेबी व्हेल 15 नोव्हेंबरला संध्याकाळी पुन्हा समुद्रकिनारी आला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा बेबी व्हेल 13 नोव्हेंबर रोजी सकाळी पहिल्यांदा निदर्शनास आला होता. वाचा सविस्तर 

Nana Patekar : नाना पाटेकरांनी चाहत्याची कानशीलं सुजवली? व्हायरल व्हिडीओवर VIDEO शेअर करत दिलं स्पष्टीकरण

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) चाहत्याच्या कानाखाली वाजवल्याप्रकरणी चर्चेत आहेत. चाहत्याच्या कानाखाली वाजवतानाचा नानांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण आता या व्हिडीओमध्ये घडलेली घटना ही शूटिंगचा भाग असल्याचं म्हणत नानांनी एक व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. वाचा सविस्तर 

16 November In History : ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचा जन्म, सचिन तेंडुलकरचा क्रिकेटला अलविदा; आज इतिहासात...

16 November In History :  इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. जगाच्या आणि देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने 16 नोव्हेंबर हा दिवस अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी युनेस्कोची स्थापना झाली होती. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू आणि बॅडमिंटनपटू पुलेल्ला गोपीचंद  यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला आहे. जगभरात आजचा दिवस सहनशीलता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वाचा सविस्तर 

Horoscope Today 16 November 2023 : आजचा गुरूवार खास! 'या' राशीच्या लोकांनी राहावं सतर्क; पाहा 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 16 November 2023 : राशीभविष्यानुसार आज (Horoscope Today) म्हणजेच 16 नोव्हेंबर 2023 रोजी गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांना आज नुकसान होऊ शकतं आणि तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो, यामुळे तुमचं मनही अशांत राहील. कर्क राशीचे लोक जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटायला जाऊ शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊया. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget