Morning Headlines 12th January : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
PM Modi In Maharashtra : महाराष्ट्रात मोदींचा झंझावात, नाशिकमध्ये मोदींचा रोड शो; आठ तासात देणार राज्याला 30 हजार कोटींची भेट
मुंबई : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज 30 हजार 500 कोटींच्या विकासकामांची भेट महाराष्ट्राला देणार आहेत. ज्याचं स्वरूप सागरी सेतू ते रेल्वेचं जाळं असं आहे. ज्यातून महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती आणि दळणवळणाला गती मिळणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याची (PM Modi in Nashik) वेळ बदलली आहे. दुपारी 12.15 ऐवजी मोदी सकाळी 10.15 वाजता नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता रोड शो सुरू होईल. 2 वाजेच्या सुमारास मोदी नाशिकहून मुंबईकडे प्रयाण करतील. वाचा सविस्तर...
Weather Update : अवकाळी पाऊस आणि थंडीपासून दिलासा, राज्यासह देशात आजचं हवामान कसं असेल?
Weather Update Today : गेल्या काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत होती. ऐन हिवाळ्यात (Winter) अवकाळी पावसानं हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली, तर शेतकऱ्यांची चिंता वाढली. आता हवामान बदल पाहायला मिळणार आहे. राज्यासह देशातील नागरिकांना अवकाळी पाऊस आणि थंडीपासून दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आता देशातून थंडीचा जोर कमी होणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि वेस्टर्न डिस्टबर्न्सचा परिणाम देशातील हवामानावर पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर...
Food Poison in School : पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा, शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा
Karnataka School Food Poison News : पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील बेळगावी येथील एका शाळेतील हा प्रकार उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा झाल्याच्या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दुधातून विषबाषा झाल्यामुळे 23 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिक्षण विभागाकडून या प्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरु आहे. वाचा सविस्तर...
Rohit Sharma : शून्यावर बाद झाल्यावरही हिटमॅनचं 'शतक' पूर्ण, रोहित शर्माच्या नावे आणखी एक विक्रम
Rohit Sharma Run Out : मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 (T20 Saries) सामन्यामध्ये भारताने अफगाणिस्तानचा (India va Afghanistan) 6 विकेट्सने पराभव केला. भारत आणि अफगाणिस्तान पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा खाते न उघडताच धावबाद झाला. शुभमन गिल आणि रोहित यांच्यात झालेल्या गोंधळामुळे टीम इंडियाला ही विकेट गमवावी लागली. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला, पण त्याने टी20 मध्ये खास शतक पूर्ण केलं आहे. वाचा सविस्तर...
12th January In History : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती, सोलापूर हुतात्मा दिन; आज इतिहासात...
12th January In History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात. आज राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे. तर, स्वामी विवेकानंद यांचीही आज जयंती आहे. हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवणारे कुमार गंधर्व यांचा स्मृतीदिन आहे. कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ आदी कार्यक्रम सादर केले आणि संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. वाचा सविस्तर...
https://marathi.abplive.com/news/maharashtra/12th-january-in-history-today-in-history-on-this-day-rajmata-jijau-jijabai-bhosale-birth-anniversary-swami-vivekanand-birth-anniversary-amrish-puri-death-anniversary-1246105
Horoscope Today 12 January 2024 : आजचा शुक्रवार खास! सर्व 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 12 January 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 12 जानेवारी 2024, रोजी शुक्रवार महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांनी आज कोणतेही मादक पदार्थ सेवन करण्यापासून दूर राहावे, अन्यथा कुटुंबात तुमची बदनामी होऊ शकते. कर्क राशीच्या लोकांनी खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी. जर तुम्हाला यकृताशी संबंधित कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर तुम्ही थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...