एक्स्प्लोर

Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...

Sanjay Raut : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. यावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय.

Sanjay Raut on Nashik & Raigad Guardian Minister : राज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Minister List) जाहीर करण्यात आली. यात नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, एका दिवसात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज होऊन दरे गावात निघून गेले होते, अशी चर्चा रंगली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केलाय.  

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री पालकमंत्रिपदाची घोषणा करून विदेशात गेले. उदय सामंत त्यांच्याबरोबर आहेत. एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी यासंदर्भात आहे. पालकमंत्रिपद हे निमित्त आहे. इतके बहुमत असलेले मुख्यमंत्री आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात हे आश्चर्य आहे. पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ का आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

आर्थिक देवाणघेवाण आणि हावरटपणातून मारामाऱ्या

ते पुढे म्हणाले की,  पालकमंत्रिपदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याचे काम करतात. जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो, तो जिल्ह्याचा असतो का? तालुक्याचा असतो का? पण पालकमंत्रिपदावरून जी दंगल सुरू आहे, ती त्या-त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी सुरू आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे. म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रिपद हवं आहे. रायगड जिल्हा सधन जिल्हा असल्याने तेथील व्यवहार सगळ्यांना माहित आहेत. तेथे अनेक उद्योग असल्याने जास्तीत जास्त खंडण्या कशा गोळा करता येतील, असा तिकडे एक हिशोब नेहमी असतो. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण आणि हावरटपणातून या मारामाऱ्या सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल, लाचार मुख्यमंत्री आहे, हे दाखवून दिले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 

केंद्राने हस्तक्षेप केला असेल तर...

संजय राऊत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे किती महत्त्व आहे हे मला माहित नाही. पण, यात केंद्राने हस्तक्षेप केला असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला आहे. महाराष्ट्राचे सरकार दिल्लीतून चालवलं जातंय. शिंदे, फडणवीस, अजित पवार या बाहुल्या आहेत. त्यांच्या हाता-पायाला बांधलेले दोरे दिल्लीतून नाचवले जातात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केलाय.

महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणात 'थैल्यांचा वापर'

नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळेल का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातून दिल्लीला कोण जास्त थैल्या देताय, त्यावर त्या नेत्याचं वजन दिल्लीत ठरते. एकनाथ शिंदे यांचे ज्या अर्थी ऐकावे लागले त्याअर्थी आम्ही ऐकतोय ते खरं आहे. कधी नव्हे तर इतक्या थैल्यांचा वापर महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणात झाला आहे. झारखंडपासून अनेक निवडणुकांचा खर्च महाराष्ट्रातील या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे त्याची किंमत असेल तर ती एकनाथ शिंदेंना मिळत असेल, असेही त्यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर

व्हिडीओ

Rohit Pawar On Ajit pawar : विमान अपघात होत असताना अजित पवार कुठे बसले होते?
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत
Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Embed widget