एक्स्प्लोर

Food Poison in School : पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा, शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा

Infected Milk To Students : शालेय पोषण आहात देण्यात येणाऱ्या दुधातून 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Karnataka School Food Poison News : पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील बेळगावी येथील एका शाळेतील हा प्रकार उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा झाल्याच्या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दुधातून विषबाषा झाल्यामुळे 23 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिक्षण विभागाकडून या प्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरु आहे.

दुधातून 23 विद्यार्थ्यांना विषबाधा 

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बेळगावी येथील सरकारी प्राथमिक शाळेत गुरुवारी, 11 जानेवारीला सकाळी मृत पाल असलेलं दूध प्यायल्याने सुमारे 23 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी शिक्षण विभागाने तपास सुरू केला आहे.

दोषींवर योग्य ती कारवाई होईल

या घटनेची माहिती मिळताच हुक्केरी गटशिक्षण अधिकारी (BEO) प्रभावती पाटील यांनी शाळेला भेट दिली. शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''बेळगावी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सर्व दूध पिणाऱ्या मुलांना संकेश्वर रुग्णालयात दाखल केलं. विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचं मूळ कारण सांगणं टाळलं." या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा शोध घेतला जाईल अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे..

शाळेत 400 विद्यार्थी घेतात शिक्षण

कर्नाटकातील उल्लागड्डी खानापूर गावातील शाळा संकुलात कन्नड, मराठी आणि उर्दू प्राथमिक शाळा आहेत. या शाळेमध्ये सुमारे 400 विद्यार्थी शिक्षण घेतात. सकाळी 11.30 च्या सुमारास मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना दूध देण्यात आलं. दुधाची सेवा करणाऱ्या एका व्यक्तीला भांड्याच्या तळाशी एक मृत पाल आढळली.

याबाबत त्यांनी तातडीने शिक्षकांना सांगितलं. ही माहिती मिळताच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप दूध प्यायलं नव्हतं, त्यांना दूध पिण्यास मज्जाव करुन त्यांच्याकडून दूध परत घेण्यात आलं. गटशिक्षण अधिकारी प्रभावती पाटील यांनी सांगितलं की, 50 हून अधिक विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थ्यांनी आधीच दूषित दूध प्यायलं होतं आणि त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

बेळगावी गावातील कर्नाटक पब्लिक स्कूलच्या कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांना दुपारी दूध पाजण्यात आलं. त्यापैकी काहींनी उलट्या आणि अस्वस्थतेची तक्रार केली. सुमारे 23 विद्यार्थ्यांना हुक्केरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काही पालकांनी अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केली असून त्याची चौकशी सध्या सुरु आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Embed widget