Morning Headlines : देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी मॉर्निंग न्यूज एका क्लिकवर
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
ऑपरेशन कावेरीत 'INS तेग' सामील, सुदानमधील भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
गेल्या 12 दिवसांपासून सुदानची (Sudan राजधानी खार्तूममध्ये सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात संघर्ष सुरु आहे. त्यामुळं तिथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षीत बाहेर काढले जात आहे. सुदानमध्ये अडकलेल्या देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी भारतानं 'ऑपरेशन कावेरी' (Operation Kaveri) सुरु केलं आहे. या ऑपरेशन कावेरीमध्ये आता 'INS तेग' सामील झालं आहे. वाचा सविस्तर
भारतनिर्मित आणखी एक कफ सिरप दूषित असल्याचा WHO चा दावा, अलर्ट जारी; पंजाबमधील कंपनीने आरोप फेटाळाले
भारतात तयार होणाऱ्या आणखी एका कफ सिरपच्या (Indian Cough Syrup) गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वैद्यकीय इशारा जारी करुन भारतात तयार केलेलं कफ सिरप दूषित असल्याचं म्हटलं आहे. मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये आढळलेले एका भारतीय कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटलं आहे. हे सिरप पंजाबमधील क्यूपी फार्माकेम या कंपनीचं असून हरियाणातील ट्रिलियन फार्मा ही कंपनी सिपरचं वितरण करते असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. वाचा सविस्तर
मानहानी प्रकरणी राहुल गांधीची गुजरात हायकोर्टात धाव
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुजरात हायकोर्टात धाव घेतली आहे. मानहानी प्रकरणात दोषित्व स्थगित करावं, अशी विनंती राहुल यांनी हायकोर्टाला केली आहे. सुरत सत्र न्यायालयानं दोषित्व स्थगित करण्यास नकार दिला होता. त्यामुळे राहुल यांची खासदारकी रद्दच राहिली. सुरतच्या महान्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सेशन कोर्टानं नकार दिला. त्यामुळे राहुलना आता हायोकोर्टाची पायरी चढावी लागली आहे. वाचा सविस्तर
जपानी स्टार्टअप 'आय-स्पेस'चं स्वप्न भंगलं, मून लँडर मोहिम अयशस्वी
जपानी (Japan) स्टार्ट अप आय स्पेसची मून लँडर मोहिम अयशस्वी ठरली आहे. मून लँडरचा पृथ्वीसोबत संपर्क तुटल्याची कंपनीने माहिती दिली आहे. चंद्रावर उतरणारी पहिली खासगी कंपनी होण्याचं स्वप्न भंगलं आहे. जपानच्या लँडरचे नाव हकोते-आर मिशन (Hakuto-R Mission) होते. यशस्वी न होण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. वाचा सविस्तर
55 व्या वर्षी भाजपचे माजी आमदार 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण, समर्थकांची जल्लोष; पुढे करणार वकिली
उत्तर प्रदेशमध्ये (UP) 10 आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल (UP Board Result 2023) जाहीर झाला आहे. यामध्ये 55 वर्षीय भाजपचे बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपुर विधानसभेचे (Bithri Chainpur Vidhansabha) माजी आमदार राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल (Rajesh Mishra) हे 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीसह ते उत्तीर्ण झाले आहेत. वाचा सविस्तर
महान गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे निधन, सिक्किम भारताचे 22 वे राज्य बनले; आज इतिहासात
26 एप्रिल ही तारीख अनेक कारणांसाठी इतिहासात महत्त्वपूर्ण आहे, त्यापैकी एक म्हणजे या दिवशी सिक्कीमचा भारतामध्ये समावेश झाला आणि ते देशाचे 22 वे राज्य बनले. याआधी, राज्यात 14 एप्रिल रोजी जनमत घेण्यात आले आणि जनतेने भारतीय संघराज्यात समावेशाच्या बाजूने मतदान केले. चीन वगळता इतर सर्व देशांनी त्याला मान्यता दिली. वाचा सविस्तर
मेष, कन्या, धनु राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. सिंह राशीचे लोक त्यांच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ आपल्या जोडीदारासाठी काढतील, तर कुंभ राशीच्या लोकांना नवीन वाहनाचा आनंद मिळेल. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर