Sudan : ऑपरेशन कावेरीत 'INS तेग' सामील, सुदानमधील भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
Sudan : सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षीत बाहेर काढले जात आहे. यासाठी भारतानं 'ऑपरेशन कावेरी' सुरु केलं आहे.
Sudan : गेल्या 12 दिवसांपासून सुदानची (Sudan राजधानी खार्तूममध्ये सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात संघर्ष सुरु आहे. त्यामुळं तिथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षीत बाहेर काढले जात आहे. सुदानमध्ये अडकलेल्या देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी भारतानं 'ऑपरेशन कावेरी' (Operation Kaveri) सुरु केलं आहे. या ऑपरेशन कावेरीमध्ये आता 'INS तेग' सामील झालं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) अधिकारी अरिंदम बागची यांनी याबाबतची माहिती दिली.
INS तेग
आयएनएस- तेग हे एकदम गती वाढवता येणारे, लगेच स्थिर होणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. हवाई, सागरी, पृष्ठभागावरील आणि पाण्याखालील मोहिमांमध्ये नौदलात समन्वय साधण्याचे काम हे लढाऊ जहाज करते. कोणत्याही हवामानात मोहिमेवर जाण्याची क्षमता असणारे हे जहाज आहे. अण्वस्त्र, जैविक आणि रासायनिक हल्ल्यापासून संरक्षणाची व्यवस्था करते. खार्तूममध्ये विमानतळ सुरु नसल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करणं शक्य नाही. युद्धाची परिस्थिती नागरिकांसाठी धोकादायक आहे आणि त्यामुळेच नागरिकांना सुरक्षा देणं गरजेचं आहे. त्यांच्या सुटकेसाठीच सुरक्षित जमिनीचा मार्ग शोधले जात आहेत.
ऑपरेशन कावेरी'च्या पहिल्या टप्प्यात सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी भारतात रवाना झाली आहे. 278 भारतीयांना भारतीय घेऊन नौदलाचे जहाज सुखरुप भारताकडे निघाले आहे. या संबंधितची माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोमवारी ट्वीट करत दिली होती. दरम्यान, खार्तूममध्ये सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात सुर असलेल्या संघर्षामुळं अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमीही झाले आहेत. खार्तूममध्ये लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक इमारती आणि वाहने देखील उद्ध्वस्त झाली आहेत.
फ्रान्सची भारताला मदत
दरम्यान, फ्रान्सने त्यांच्या हवाईदलाच्या सहाय्याने पाच भारतीय नागरिकांना सुखरुपणे बाहेर काढले असल्याची माहिती फ्रान्सच्या राजनैतिक सूत्रांनी दिली आहे. या भारतीयांना इतर देशातील नागरिकांसोबत फ्रान्सच्या वायूदलाच्या विमानतळावर उतरवण्यात आले. त्यांचे जवळचे संबंध असलेल्या देशांच्या 66 नागरिकांना सुखरुपणे सुदानमधून बाहेर काढण्यात आले. यात काही भारतीयांचा देखील समावेश असल्याची माहिती सौदी अरेबियाने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदाममधील भारतीय नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्व भारतीय नागरिकांना सुखरुपणे बाहेर येतील असं आश्वासन देखील परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: