एक्स्प्लोर

Horoscope Today 26 April 2023 : मेष, कन्या, धनु राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 26 April 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 26 April 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. सिंह राशीचे लोक त्यांच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ आपल्या जोडीदारासाठी काढतील, तर कुंभ राशीच्या लोकांना नवीन वाहनाचा आनंद मिळेल. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. इतरांच्या यशाचे कौतुक करून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. तुमच्या नवीन प्रकल्पांसाठी पालकांना विश्वासात घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आज मिळालेली कोणतीही चांगली बातमी तुमचा उत्साह द्विगुणित करेल. आज तुम्हाला मोकळा वेळ मिळेल. या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचा परिणाम तुमच्यावर कसा होईल हे जाणून घ्या. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरदार लोकांना नोकरीत बदल दिसतील.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे नोकरी करत आहेत, ते आज दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही केलेल्या कामामुळे तुमचे वरिष्ठ खूप खूश होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे काही शत्रू वारंवार तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. बेरोजगारांना नवीन रोजगार मिळण्यास थोडा वेळ लागेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडाल. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. कुटुंबातील सदस्यांचा चांगला सल्ला मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल. तुमचे प्रेम जीवन आनंददायी असणार आहे. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन उंची देऊ शकता. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी तुमच्या आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करेल. नोकरदार लोक नोकरीतील बदलाबाबत संभ्रमात राहतील. पालकांसोबत थोडा वेळ घालवा. तुमच्या व्यस्त दिवसात तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. तुमच्या दिवसाची सुरुवात छान होईल आणि त्यामुळे उद्या दिवसभर तुम्हाला उत्साही वाटेल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. विद्यार्थी मोठ्या मनाने स्पर्धेची तयारी करताना दिसतील. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या मित्रांना साथ देऊ नका. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. सर्व खर्च बजेट करून केले तर बरे होईल. मित्राच्या मदतीने बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरी पूजा, पाठ आयोजित होतील. जोडीदाराच्या तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. राजकारणात करिअर करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही आज अतिरिक्त पैसे कमवू शकता. कुटुंबातील सदस्यांचा चांगला सल्ला तुमचा मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एखाद्या तज्ञाशी सल्लामसलत केल्यास चांगले होईल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासाठी काढा, जिथे तुम्ही चांगल्या गोष्टी बोला. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. संमेलनांना संबोधित करण्याचीही संधी मिळणार आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमच्या मनात झटपट पैसे कमावण्याची इच्छा जागृत होईल. बदलत्या हवामानामुळे आईच्या तब्येतीत चढ-उतार असतील.  विद्यार्थ्यांना कोणत्याही नवीन विषयाचा अभ्यास करण्याची संधीही मिळेल. शेजारच्या वादात पडणे टाळा. धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. मित्रांच्या मदतीने नवीन संधी मिळतील. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जे व्यवसाय करत आहेत, त्यांना व्यवसाय पुढे नेण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. नवीन संपर्क वाढतील. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला हळूहळू मिळतील. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराबरोबर धार्मिक स्थळाला भेट देण्याचा बेत होईल. मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. एखाद्या खास व्यक्तीसोबत भेटही होईल. एखादे काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर वेळ चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घर, फ्लॅट, दुकान खरेदी करण्यासाठी तुम्ही ज्या योजना आखत होतात त्यात तुम्हाला यश मिळेल. प्रेम जीवन जगणारे लोक आपल्या प्रियकरासह आनंदाचे क्षण घालवतील.

वृश्चिक

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, त्यांच्यासोबत मजा करा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, ज्यामुळे व्यवसायात यश मिळेल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असल्याने नोकरदार लोकांना थोडा त्रास होईल. धीर धरा कारण तुमची समज आणि प्रयत्न तुम्हाला नक्कीच यश मिळवून देतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करा. आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्यास पालक खूप आनंदी दिसतील. तुम्ही शेजारच्या परिसरात होणार्‍या पूजा-पाठात सहभागी व्हाल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. प्रॉपर्टी डीलिंग करणाऱ्या स्थानिकांना चांगला व्यवहार मिळू शकतो.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही खास नाही. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बराच वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. नोकरदारांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. तुम्हाला अचानक प्रवासाला जावे लागू शकते. प्रवास तुमच्यासाठी ठीक राहील. अनोळखी व्यक्तीची भेटेल. कोणाच्याही सल्ल्याने पैसे गुंतवू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल. रोजच्या दिनचर्येत मॉर्निंग वॉक आणि योगा यांचा समावेश असेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, तुम्हाला आर्थिक लाभ होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैसे कसे वाचवायचे ते तुम्ही तुमच्या वडिलांकडून शिकून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. घर, फ्लॅट घेण्याचे नियोजन होते, ते यशस्वी होईल. नवीन वाहनाचा आनंदही मिळू शकतो. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल.  नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल.

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. कुटुंबात सुरू असलेल्या समस्यांवर उपाय शोधण्यात सक्षम व्हाल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना भरपूर नफा मिळेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक सदस्यांसोबत तुम्ही काही धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना करा. समाजाच्या हितासाठी केलेल्या कार्याचा सन्मान मिळेल. घरामध्ये पूजा, पाठ आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांची ये-जा सुरु असेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्हाला उच्च अधिकार्‍यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today : मिथुन, कन्या आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Embed widget