एक्स्प्लोर
अवघ्या काही तासातच मान्सून केरळमध्ये दाखल होणार!

त्रिवेंद्रम : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पुढील 36 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सलग 3 वर्षांच्या दुष्काळानंतर येणाऱ्या पावसाची शेतकरीही आतुरतेने वाट पाहत आहे. केरळच्या त्रिवेंद्रममध्ये सोमवारी रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ऊन-सावलीचा सुरु असलेला लपंडाव लवकरच संपण्याची चिन्हं आहेत. एबीपी माझाची मान्सून एक्स्प्रेस पावसाची वर्दी देण्यासाठी केरळमध्ये दाखल झाली आहे. केरळच्या वातावरणातील बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. दरम्यान, यंदा सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात अतिरिक्त पाऊस पडेल, असं भाकितही वर्तवलं आहे.
संबंधित बातम्या
मान्सून दारात उभा, 48 तासात केरळात एण्ट्री
मान्सून आणि पूर्व मान्सून कसा ओळखाल?
मान्सून 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात, वेधशाळेचा अंदाज
केरळात मान्सून आल्याचं कसं कळतं?
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस : स्कायमेट
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
क्रिकेट























