(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monsoon News : पाहा कोणत्या वर्षी कोणत्या तारखेला मान्सूनचं केरळमध्ये झालं आगमन? हवामान विभागान दिली 2013 पासूनची माहिती..
सरासरी मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो. यंदा तीन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे.
Monsoon News : केरळ मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर वातावरणात हळूहळू बदल जाणवू लागला आहे. सर्वजण मान्सूनच्या प्रतिक्षेत होते, अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढच्या सहा ते सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रथम मान्सून कोकणात दाखल होऊल त्यानंतर महाराष्ट्रात हळूहळू दाखल होणार आहे. दरम्यान, दरवर्षी मान्सून 1 जूनला दाखल होत असतो, यंदा मान्सून तीन दिवस आधीच म्हणजे 29 मे रोजी दाखल झाला आहे. पाहुतात आत्तापर्यंत मान्सूनचं केरळमध्ये कधी आगमन झालं आहे.
भारतीय हवामान विभागाने 2013 पासूनच्या तारखा दिल्या आहेत. 2013 पासून आत्तापर्यंत मान्सून केरळमध्ये कधी दाखल झाला हे सांगण्यात आले आहे.
वर्ष केरळमध्ये मान्सूनचे आगमन
2013 | 1 जून |
2014 | 6 जून |
2015 | 5 जून |
2016 | 8 जून |
2017 | 30 मे |
2018 | 29 मे |
2019 | 8 जून |
2020 | 1 जून |
2021 | 3 जून |
2022 | 29 मे |
पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा अंदाज
2013 नंतर विचार केला तर मान्सून फक्त तीन वर्ष मान्सून मे महिन्यात केरळमध्ये दाखल झाला आहे. 2017, 2018 आणि यंदा म्हणजे 2022 या वर्षात मान्सून मे महिन्यात केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान, केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या सात दिवसात तळकोकणात दाखल होत असतो. यंदाही 4 ते 5 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तो मुंबई, पुणे अन्य ठिकाणी पाऊस बरसणार आहे. जूनमधील मान्सूनचा प्रवास पहिल्या दोन आठवड्यात मंदावलेला असेल, त्यानंतर तो सर्वत्र बरसेल अशी स्थिती दिसत आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं चांगलेची हजेरी लावल्याचे दिलस आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. दरम्यान, पुढील 4 दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही भागात गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या: