एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही, अरुण जेटलींचं मायावतींना प्रत्युत्तर
बसप अध्यक्ष मायावतींच्या पंतप्रधान मोदीं राजकारणासाठी जातीचा वापर करत असल्याच्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले आहे. 'मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही', असं ट्वीट जेटली यांनी केलं आहे.
![पंतप्रधान मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही, अरुण जेटलींचं मायावतींना प्रत्युत्तर Modi Never Practised Caste Politics tweets Arun Jaitley पंतप्रधान मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही, अरुण जेटलींचं मायावतींना प्रत्युत्तर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/22235549/arun-jaitley1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : बसप अध्यक्ष मायावतींच्या पंतप्रधान मोदीं राजकारणासाठी जातीचा वापर करत असल्याच्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले आहे. 'मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही', असं ट्वीट जेटली यांनी केलं आहे.
बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्वतःच्या जातीचा मागास जातीत समावेश करुन घेतल्याचा आरोप केला होता. त्या आरोपावर जेटली यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'पंतप्रधानांच्या जातीचा काय संबंध? त्यांनी कधीही जातीचं राजकारण केलेलं नाही. आतापर्यंत त्यांनी फक्त विकासाचं राजकारण केलं आहे', असं ट्वीट जेटली यांनी केलं आहे. तसेच 'जातीचं नाव घेऊन जे लोक गरिबांना फसवत आहेत त्यांना यश मिळणार नाही. जातीचं राजकारण करुन त्यांनी फक्त पैसे कमवले आहेत. बसप किंवा राजद प्रमुखांच्या कुटुंबाकडील संपत्तीच्या प्रमाणात मोदींकडे 0.01 टक्के देखील संपत्ती नाही', असंही जेटली यांनी लिहीले आहे.
How is the Prime Minister’s caste relevant? He has never done caste politics. He has only done developmental politics. He is inspired by nationalism. (1/2)
— Chowkidar Arun Jaitley (@arunjaitley) April 28, 2019
पंतप्रधान मोदींनी राजकीय फायद्यासाठी त्यांच्या जातीचा वापर केल्याचा आरोप बसप अध्यक्ष मायावतींनी केला आहे. 'पंतप्रधान मोदी वरच्या जातीतील आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करुन घेतला', असा आरोप मायावतींनी केला आहे.Those who are deceiving the poor in the name of caste will not succeed. They have only amassed wealth in the name of caste politics. The Prime Minister’s assets are not even 0.01% when compared to the First Family of the BSP or the RJD. (2/2)
— Chowkidar Arun Jaitley (@arunjaitley) April 28, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)