एक्स्प्लोर
Advertisement
नोटाबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयावरुन लोकसभा आणि राज्यसभेत सुरु असलेल्या गोंधळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. जवळापास 45 मिनीटांच्या या बैठकीत पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर घेण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती राष्ट्रपतींना दिली.
या बैठकीनंतर पंतप्रधानांच्या या निर्णयाचे कौतुक करताना राष्ट्रपतींनी यावर अधिक काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ''मी स्वत: अर्थ मंत्रालयाचे काम पाहिले असल्याने, अशा निर्णयाचे परिणाम लगेच दिसत नाहीत. यासाठी वाट पाहण्याची गरज असते.'' या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या निवेदनावरही चर्चा झाली. यावर पंतप्रधानांनी आपण निर्णयावर ठाम असल्याचे सांगून हा निर्णय अतिशय विचारपुर्वक घेतलेला असल्याचे सांगितले.Delhi: Prime Minister Narendra Modi today met President Pranab Mukherjee at Rashtrapati Bhavan pic.twitter.com/mT3qSDWWLp
— ANI (@ANI_news) November 18, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement