ISRO : 2024 मधील इस्रोचे आणखी एक दमदार मिशन, 'नॉटी बॉय रॉकेट' आज लॉंच होणार, आता हवामानाची स्थिती जाणून घेणं होणार सोपं!
ISRO INSAT-3DS Launch : बदलत्या हवामानासोबतच अवकाशातील हा सॅटेलाइट भविष्यातील आपत्तींचीही वेळेवर माहिती देणार आहे. या मिशनसाठी इस्रोकडून विशेष रॉकेटचा वापर करण्यात आला आहे.
ISRO INSAT-3DS Launch : आता भारतातील हवामानाची स्थिती सहज जाणून घेणे शक्य होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज हवामान उपग्रह म्हणजेच वेदर सॅटेलाइट (Weather Satellite) लॉंच करणार आहे. बदलत्या हवामानासोबतच अवकाशातील हा सॅटेलाइट भविष्यातील आपत्तींचीही वेळेवर माहिती देणार आहे. या मिशनसाठी इस्रोकडून विशेष रॉकेटचा वापर करण्यात आला आहे. ज्याला 'नॉटी बॉय' म्हणून ओळखले जाते. हे रॉकेट जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेइकल (GSLV) च्या नावाने ही ओळखण्यात आले आहे. ISRO ने या संदर्भात माहिती देताना सांगितले की, GSLV-F14 हे रॉकेट शनिवारी संध्याकाळी 5.35 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉंच करण्यात येईल. या रॉकेटसाठी स्वदेशी विकसित क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले असून याचे हे 10 वे उड्डाण असेल. ISRO च्या माहितीनुसार, मेट्रोलॉजिकल सॅटेलाईट INSAT-3DS GSLV रॉकेटद्वारे लॉंच करण्यात येईस. . इस्रोच्या या नवीन प्रक्षेपणाशी संबंधित जाणून घ्या.
आज सायंकाळी होणार लॉंचिंग
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी ही माहिती दिली. सोळाव्या मोहिमेअंतर्गत GSLV-F14 चे उड्डाण शनिवारी संध्याकाळी होणार आहे. हा उपग्रह GSLV Mk II रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला जाईल. INSAT-3DS उपग्रह हे हवामानशास्त्रीय उपग्रहासाठी पाठपुरावा करणारे मिशन आहे. त्याला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पूर्ण अर्थसहाय्य दिले आहे.
INSAT-3DS चे कार्य काय असेल?
2274 किलो वजनाचा उपग्रह, एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, पृथ्वी विज्ञान, हवामानशास्त्र विभाग (IMD), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT), हवामान अंदाज केंद्र आणि भारतीय राष्ट्रीय केंद्र अंतर्गत विविध विभागांना सेवा देईल. 51.7 मीटर लांबीच्या रॉकेटमध्ये इमेजर पेलोड, साउंडर पेलोड, डेटा रिले ट्रान्सपॉन्डर, सॅटेलाइट एडेड सर्च आणि रेस्क्यू ट्रान्सपॉन्डर असेल. ज्याचा उपयोग ढग, धुके, पाऊस, बर्फ, आग, धूर, जमीन आणि महासागर यांचा अभ्यास करण्यासाठी केला जाईल.
या मिशनचा उद्देश काय आहे?
इस्रोने सांगितले की, या मोहिमेची प्राथमिक उद्दिष्टे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे, अवकाशातील हवामानाची स्थिती, सागरी निरीक्षणे आणि त्याचे वातावरण आहे, वातावरणाच्या विविध हवामानविषयक माहिती देण्यासाठी डेटा संकलन प्लॅटफॉर्म (DCPs) वरून डेटा संकलन, उपग्रह साहाय्यित शोध आणि आपत्कालिन स्थितीची पूर्व माहिती सेवा प्रदान करणे हे आहे. हा उपग्रह सध्या कार्यरत असलेल्या इनसॅट-3डी आणि इनसॅट-3डीआर उपग्रहांसोबत हवामानविषयक सेवाही देईल. भारतीय हवामान विभाग, नॅशनल सेंटर फॉर मिडियम-रेंज वेदर फोरकास्टिंग, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, इंडियन नॅशनल ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस सेंटर आणि इतर विविध एजन्सी आणि संस्था यासारख्या भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभाग यात समाविष्ट आहेत. हवामान अंदाज सुधारणे आणि हवामानशास्त्र सेवा प्रदान करण्यासाठी INSAT-3DS उपग्रह कार्य करेल.
इन्सॅट मालिका म्हणजे काय?
ISRO ने भारतातील दळणवळण, प्रसारण, हवामानशास्त्र, शोध आणि बचाव गरजा पूर्ण करण्यासाठी इन्सॅटची निर्मिती केली आहे. जिओ स्टेशनरी उपग्रहांची मालिका 1983 मध्ये सुरू झाली. आशिया पॅसिफिक प्रदेशातील ही सर्वात मोठी स्थानिक दळणवळण प्रणाली आहे. कर्नाटकातील हसन आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथून या उपग्रहाचे निरीक्षण आणि नियंत्रण केले जाते. या मालिकेतील सहा उपग्रह आतापर्यंत प्रक्षेपित करण्यात आले आहेत.