Russian Ukraine War : बुडापेस्टची मोहिम फत्ते, शेवटच्या विद्यार्थ्यांना घेऊन केंद्रीय मंत्री भारतात
Russian Ukraine War : भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत युक्रेनमधील विविध भागातून भारतीयांना मायदेशी आणले आहे.
Russian Ukraine War : मागील 12 दिवसांपासून रशिया-युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत युक्रेनमधील विविध भागातून भारतीयांना मायदेशी आणले आहे. सोमवारी बुडापेस्टमधून सर्व विद्यार्थ्यांना मायदेशात आणले आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी या विमानासोबत आले आहेत.
बुडापेस्टमधून केंद्रीय मंत्री सहा हजार 711 विद्यार्थ्यांना घेऊन मायदेशात परतले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी काही फोटोही पोस्ट केले आहेत. बुडापेस्टमधील अखेरच्या सहा हजार 711 विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीमध्ये दाखल झालो आहे. हे तरुण लवकरच आपल्या घरी पोहचलीत. लवकरच सर्वजण आपल्या आईवडिलांसोबत आणि कुटुंबासोबत असतील. त्यांच्या घरात आनंद आणि उत्साह असेल, असे ट्विट हरप्रीत सिंह पुरी यांनी ट्विट केले आहे.
Delighted to reach Delhi with the last batch of our 6711 students from Budapest. There is joy, enthusiasm & relief as youngsters reach home & will soon be with their parents & families.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 7, 2022
Deeply privileged to be of help. #OperationGanga @PMOIndia @MEAIndia @IndiaInHungary pic.twitter.com/hqUngUaOCj
देह शिवा बर मोहे ईहे,
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 7, 2022
शुभ कर्मन ते कभुं न टरूं
The 6E aircraft which flew us to Budapest on 1 March later returned as the 5th evacuation flight with our students.
Last night we boarded the 31st evacuation flight for Delhi with our students.#OperationGanga pic.twitter.com/1225EqgtDe
मागील आठवडाभरापासून ऑपरेशन गंगा अंतर्गत 16 हजार पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून मायदेशात आणले आहे. खारकीव्ह, सुमी येथून सर्वांना मायदेश आणण्यात आले आहे.
ऑपरेशन गंगा अंतर्गत चार मंत्र्यांवर जबाबदारी -
रशिया हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती नाजूक आणि भयावह झाली होती. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थ्यी आणि नागरिक अडकले होते. येथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत मोहिम राबवली होती. याची जबाबदारी चार मंत्र्यांवर सोपवली होती. ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप सिंह पुरी, किरेन रिजिजू आणि व्ही के सिंह यांना हंगेरी, रोमानिया, स्लोवाकिया आणि पोलांड येथे पाठवण्यात आले होते. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याची जबाबदारी या चार मंत्र्यांवर होती. व्ही.के. सिंह यांच्यावर पोलांड, हरदीप सिंह पुरी यांना हंगेरी, रोमानियाची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया आणि स्लोवाकियाची जबाबदारी किरेन रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आली होती.