एक्स्प्लोर

Mirza Ghalib Birth Anniversary: 'पूछते हैं वो कि 'ग़ालिब' कौन है, कोई बतलाओ कि हम बतलाएं क्या', गालिबच्या शायरीची जादू आजही कायम

Mirza Ghalib Birth Anniversary: मिर्झा असदुल्लाह बेग खान ज्यांना आपण सगळे मिर्झा 'गालिब' या नावाने ओळखतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊ..

Mirza Ghalib Birth Anniversary: मिर्झा असदुल्लाह बेग खान ज्यांना आपण सगळे मिर्झा 'गालिब' (Mirza Ghalib) या नावाने ओळखतो. त्यांच्या शायरीमुळे ते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. आजही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांनी जरी फारशी भाषेत शायरी लिहिण्यास सुरुवात केली असली, तरी ते पुढे उर्दू भाषेतील शायर म्हणून खूप प्रसिद्ध झाले. म्हणूनच गालिब (Mirza Ghalib) यांना उर्दू-फारसी भाषेतील सर्वकालीन महान शायर म्हटले जाते. गालिब यांनी शायरी आणि गझलला नवे रूप दिले. अनेकजण गालिब यांची गझल केवळ प्रेमाच्या संदर्भात पाहतात. मात्र त्यांनी आपल्या गझलेतून जीवनाचे तत्वज्ञान आणि रहस्य देखील मांडले आहे. आज त्यांची जयंती असून याच निमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊ..

मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांचा जन्म 27 डिसेंबर 1797 रोजी उत्तरे प्रदेशमधील आग्रा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल्ला बेग आणि आईचे नाव इज्जत उत निसा बेगम होते. गालिब जेव्हा फक्त 5 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. पण काही काळाने काकांचंही निधन झालं. त्यानंतर ते आपल्या आजोबांकडे आले. वयाच्या 13 व्या वर्षी उमराव बेगम यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांनी वयाच्या 11 व्या वर्षी उर्दू आणि पर्शियन भाषेत शायरी आणि गझल लिहायला सुरुवात केली. ते असे शायर होते की, उभ्या उभ्या गझल रचायचे. यामुळेच गालिब हे भारत-पाकिस्तानसह जगभरातील कोट्यवधी लोकांचे आवडते शायर आहेत. गालिब यांच्या अनेक गझल आणि शेर लोकांना तोंडपाठ आहेत. 1850 मध्ये अखेरचा मोगल बादशाह बहादूरशाह जफरने मिर्झा गालिब यांना दबीर-उद-मुल्क आणि नज्म-उद-दौला या पदव्या बहाल केल्या होत्या. यानंतर त्यांना मिर्झा नोशा ही पदवीही मिळाली.

उर्दू भाषेचे शायर म्हणून मिर्झा गालिब (Mirza Ghalib Shayari) यांचे नाव आजही लोक आदराने घेतात. पण तुम्हाला माहित आहे का मिर्झा गालिब यांनी केवळ गझल आणि शायरीच नाही तर अनेक पत्रेही लिहिली आहेत. त्यांच्या पत्रांबद्दल असं म्हटलं जातं की, गालिबचं पत्र वाचल्यावर गालिब वाचकाशी बोलत असल्याचा भास होतो. गालिब यांनी गझल लिहिली नसती तर त्यांची पत्रे खूप प्रसिद्ध झाली असती, असेही म्हटले जाते. 15 फेब्रुवारी 1869 रोजी मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांचे निधन झाले. त्यांना हजरत निजामुद्दीनच्या (दिल्ली) दर्गाजवळ दफन करण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूच्या इतक्या वर्षांनंतरही आपल्या शायरीतून ते आजही जिवंत आहेत. 

SHAYARI OF MIRZA GHALIB: गालिब यांचे काही निवडक शेर 

हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन,
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है. 

हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले. 

उन के देखे से जो आ जाती है मुँह पर रौनक़,
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है.

न था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता, 
डुबोया मुझ को होने ने न होता मैं तो क्या होता.

बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मिरे आगे,
होता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget