एक्स्प्लोर

रामविलास पासवान यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गुरुवारी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं. दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी 74 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

पाटणा : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  केंद्रीय कायदा आणि विधि मंत्री रविशंकर प्रसाद हे पाटण्यात होणाऱ्या या अंत्यसंस्कारावेळी केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व करणार आहेत. पासवान यांचं पार्थिव आज दुपारी 12.30 वाजता त्यांच्या पाटण्यातील निवासस्थान कृष्णा पुरी वरुन जनार्दन घाट (दीघा) इथं आणलं जाईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. गुरुवारी सायंकाळी त्यांचं निधन झालं होतं.

रामविलास पासवान यांचं पार्थिव शरीर शुक्रवारी रात्री पाटण्याला नेण्यात आलं. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. पाटण्यात  विधानसभा आणि पार्टी ऑफिसमध्ये पासवान यांना श्रद्धांजली अर्पित केली गेली.  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासब राज्यातील अनेक नेत्यांनी पुष्प अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. गुरुवारी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं. दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी 74 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रामविलास पासवान यांची राजकीय कारकिर्द रामविलास पासवान लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष होते. बिहारमधून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पासवान यांनी बी.ए. आणि त्यानंतर एल.एल.बी.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पोलीस सेवेत नोकरी मिळाल्यानंतर ती न स्वीकारता त्यांनी राजकीय मार्ग स्वीकारला. विश्वनाथ प्रताप सिंह, एचडी देवगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह आणि आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदं भूषवली. पहिल्यांदा ते 1969 मध्ये ते बिहार विधानसभेवर निवडून आले. राम विलास पासवान यांनी 32 वर्षात 11 निवडणुका लढल्या आणि त्यापैकी 9 जिंकल्या. देशाच्या सहा पतप्रधानांसोबत काम करण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावे आहे. 1989 मध्ये ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर एच. डी. देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळातही ते होते. गुजराल सरकारमध्ये त्यांनी रेल्वेमंत्री पदाचा कारभार पाहिला. रामविलास पासवान आठ वेळा लोकसभा सदस्य आणि विद्यमान राज्यसभेचे खासदार होते. संयुक्त समाजवादी पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली आणि 1969 मध्ये ते पहिल्यांदा बिहार विधानसभेवर निवडून गेले. 1977 मध्ये हाजीपूर मतदारसंघातील जनता पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर ते 1980, 1989, 1996, 1998, 1999, 2004 आणि 2014 मध्ये खासदार राहिले. त्यानंतर 2000 साली त्यांनी लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली. त्यानंतर 2004 मध्ये ते सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सामील झाले आणि रसायन व खते मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयामध्ये केंद्रीय मंत्री राहिले.

महत्त्वाच्या बातम्या

Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget