एक्स्प्लोर

शहीद नायक दीपक सिंह यांची पत्नी होणार भारतीय सैन्यात दाखल, गलवान संघर्षात दीपक यांना आलं होतं वीरमरण 

Martyr Deepak Singh : जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या झटापटीवेळी शहीद झालेले नायक दीपक सिंह यांची पत्नी रेखा देवी आता भारतीय सैन्यात भरती होणार आहेत.

Martyr Deepak Singh : गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या झटापटीवेळी शहीद झालेले नायक दीपक सिंह यांची पत्नी रेखा देवी आता भारतीय सैन्यात भरती होणार आहेत. जून 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामध्येच मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील दीपक सिंह शहीद झाले होते.

दीपक त्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या पत्नी रेखा देवी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे वीरचक्र पदान करण्यात आले होते. 

शहीद दीपक यांची 23 वर्षीय पत्नी रेखा देवी यांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण संस्थेची (OTA) परीक्षा दिली आहे. या परीक्षेत त्या पास झाल्या आहेत. रेखा देवी या परीक्षेत पास झाल्यानंतर आता त्यांची मेडिकल तपासणी होणार आहे. त्यामुळे पती दीपक सिंह यांच्यानंतर त्याही देशाची सेवा करण्यासाठी भारतीय सैन्यात दाखल होत आहेत. 

 OTA च्या परीक्षेत पास झाल्यानंतर रेखा देवी यांनी प्रयागराज येथील सेवा निवड मंडळात पाच दिवस मुलाखतीचे राऊंड दिले. त्यानंतर त्यांची निवड करण्यात आली. रेखा देवी या आता 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेतील. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या प्रत्यक्षात आपल्या देश सेवेला सुरूवात करतील. 

नायक शहीद दीपक सिंह हे मध्य प्रदेश मधील रीवा जिल्ह्यातील राहणारे होते. ते बिहार रेजिमेंटमधील 19 व्या बटालियमध्ये कार्यरत होते. दीपक सिंह हे वैद्यकीय सहाय्यक होते. गलवान खोऱ्यात चीन सैनिकांसोबत भारतीय सैन्याची झटापट झाली त्यावेळी दीपक सिंह यांनी 30 जवानांना  वैद्यकीय सेवा पुरवली होती. परंतु, सेवा पुरवत असताना ते स्वत:ही जखमी झाले होते. उपचार सुरू असताना ते शहीद झाले. लग्नानंतर फक्त एकदाच दीपक सिंह पत्नी रेखा देवी यांना भेटले होते. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Virar Attack: विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची मातीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 03 जुलै 2024: ABP MajhaSensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवरABP Majha Headlines :  11:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Virar Attack: विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
Kolhapur News : जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Embed widget