China : गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या झटापटीत चीनचे 38 सैनिक ठार, मृतांची आकडेवारी लपवणाऱ्या चीनचा बुरखा फाटला
China Hiding Losses of Soldiers : भारत आणि चीन सैनिकांमध्ये जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात (Galwan Valley) झालेल्या झटापटीत चीनचे 38 सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
China Hiding Losses of Soldiers : जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात (Galwan Valley) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत चीनचे 38 सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही झटापट झाल्यानंतर चीनने केवळ चारच सैनिक ठार झाल्याचे म्हटले होते. परंतु, ऑस्ट्रेलियातील 'द क्लैक्सन' या वृत्तपत्राने चीनचे चार नाही तर 38 सैनिक या झटापटीवेळी गलवान नदीत वाहून गेल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा लपवणाऱ्या चीनचा बुरखा फाटला आहे.
'द क्लैक्सन' वृत्तपत्राने दिलेल्या लेखात म्हटले आहे की, "चीनच्या पीपल्य लिबरेशन आर्मीची भारतीय सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत चीनने जो मृतांचा अकडा सांगितला आहे, त्यापेक्षा नऊ पटीने जास्त सैनिक ठार झाले आहेत. ही घटना घडली त्यावेळी चिनचे 38 सैनिक अंधारातून वेगाने वाहत असलेली नदी पार करत होते. त्यावेळी हे सर्व सैनिक या नदीत वाहून गेले.
तब्बल एक वर्षानंतरच्या तपासानंतर सोशल मीडिया संशोधकांच्या एका समूहाने याबाबत अहवाल तयार केला आहे. 'द क्लैक्सन' वृत्तपत्राने आपल्या लेखात हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या वृत्तपत्राचं म्हणणं आहे की, चीनने जाहीर केलेल्या मृत पावलेल्या चार सैनिकांपैकी फक्त एक ज्युनियर सार्जंट वांग झुओरन बुडाल्याची नोंद आहे. अहवालात असे म्हटले आहे की, त्या रात्री वांगसोबत चिनचे 38 सैनिक नदीत वाहून गेले आहेत. या अहवालात चिनी ब्लॉगर्ससोबतची चर्चा, काही चीनच्या ननागरिकांकडून मिळालेली माहिती आणि चीन सैनिकांच्या मोठ्या जीवितहानीबद्दल मीडिया रिपोर्ट्सचा एक वर्षभर चाललेला तपास यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. 15 आणि 16 जून 2020 च्या रात्री ही घटना घडली होती. सीमेवरील या झटापटीत भारताच्या 20 सैनिकांना वीरमरण आलं होतं. तर या झटापतीत चीनने आपले फक्त चार सैनिक ठार झाल्याचे म्हटले होते. मृतांची खरी संख्या लपवण्याचा प्रयत्न चीनने त्यावेळी केला होता. परंतु, आता ऑस्ट्रेलियाच्या या वृत्तामुळे त्यांचा बुरखा फाटला आहे.
महत्वाच्या बातम्या