एक्स्प्लोर

ट्विटरवर बदलीची मागणी करणाऱ्याला स्वराज यांनी झापलं

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांंच्याकडे ट्विटरवर तक्रार केल्यास तत्परतेने दखल घेत त्या संबंधितांना दिलासा देतात. मात्र अवाजवी मागणी करणाऱ्या एका इसमाचे कान स्वराज यांनी उपटल्याचं एक उदाहरण समोर आलं आहे. आपली पत्नी रेल्वे खात्यात असून ती सध्या झाशीला आहे. मात्र तिची बदली पुण्यात करा आणि आमचा वनवास संपवा, अशी मागणी सुषमा स्वराज यांना ट्विटरवरुन करणं, एकाच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्वराज यांनी संबंधित इसमाला ट्विटरवरुन मात्र चांगलंच झापलं. या प्रकरणाची सुरुवात खरं तर एका वेगळ्याच ट्वीटने झाली. अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने सुषमा स्वराज यांना मेन्शन करुन शनिवारी एक ट्वीट केला. पासपोर्टच्या प्रॉब्लेममुळे आपल्या पत्नीला भारतातून अमेरिकेत येण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तो लवकर क्लिअर करुन तिच्या परदेशवारीचा मार्ग मोकळा करावा, असं आर्जव त्याने केलं. https://twitter.com/sanjay_pandita1/status/817921576175828998 https://twitter.com/SushmaSwaraj/status/817937043095429120 सुषमा स्वराज यांनी नेहमीप्रमाणेच तत्परतेने याची दखल घेतली. परदेशातील भारतीय व्यवहार मंत्रालयाचे सचिव डी एम मुळे यांना टॅग करत या जोडप्याचा 'वनवास' संपवण्याची विनंती केली. याच ट्वीटचा आधार घेत एका ट्विटर यूझरने सुषमा स्वराज यांच्याकडे मागणी केली. 'माझी पत्नी रेल्वे खात्यात असून ती सध्या झाशीला आहे. तिथे नोकरीत रुजू होऊन वर्ष उलटलं. तिची बदली माझ्याजवळ म्हणजे पुण्यात करा आणि आमचा वनवास संपवा' असा हट्ट त्याने धरला. https://twitter.com/smitraj07/status/818127514791006208 आपल्या ट्वीटला सुषमा स्वराज खेळीमेळीत उत्तर देतील, अशी त्याची अपेक्षा असावी. मात्र त्याचा ट्वीट त्याच्यावरच उलटला. 'तू किंवा तुझी पत्नी माझ्या (परराष्ट्र) विभागात असता आणि ट्विटरवरुन अशा पद्धतीने बदलीची मागणी केली असती, तर मी निलंबनाची कारवाई केली असती' असं उत्तर खवळलेल्या सुषमा स्वराज यांनी दिलं. https://twitter.com/smitraj07/status/818127514791006208 इथवर न थांबता, स्वराज यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना टॅग करत 'मला असा ट्वीट आला आहे' असं म्हटलं. प्रभूंनी मात्र बदली करणं आपल्या अखत्यारित नसून रेल्वे बोर्ड त्यात लक्ष घालतं, असं सांगत प्रकरण वाढवलं नाही. https://twitter.com/sureshpprabhu/status/818148747032965120

संबंधित बातम्या :

परदेशात अडचणीत आहात?, ट्वीट करुन मला टॅग करा : सुषमा स्वराज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget