एक्स्प्लोर

Mann ki Baat : यंदाच्या वर्षातील शेवटची 'मन की बात' आज, पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचे लक्ष

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आज 'मन की बात'चा 84वा भाग प्रसारित होणार आहे.

Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बातमधून देशवासियांना संबोधित करणार आहेत. या वर्षातील ही शेवटची मन की बात असेल. काल 12 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण, बुस्टर डोसबाबत मोठी घोषणा केल्यानंतर आज मन की बातमध्ये पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल रात्री देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासह (Vaccination) बूस्टर डोस संबंधीदेखील माहिती दिली. 

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि डीडी चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 84वा भाग आहे. प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात.

नोव्हेंबर 2021 च्या गेल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलिया आणि बुंदेलखंडच्या झाशीचं एक वेगळं नातं असल्याचं म्हटलं होतं.'सॅक्रेड इंडिया गॅलरी'चा उल्लेख करत त्यांनी भारत-ऑस्ट्रेलियाच्या संबंधांवर भाष्य केलं होतं. शिवाय पुण्याच्या  मयूर पाटील या तरुण उद्योजकाशी देखील स्टार्टअपसंदर्भात त्यांनी संवाद साधला होता.  

2014 पासून सतत करत आहेत 'मन की बात'

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 84 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. आज 26 डिसेंबर रोजी प्रसारित होणारा 'मन की बात' हा कार्यक्रम या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम असेल.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्वाच्या बातम्या

PM Modi about Vaccine for children : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीन मोठ्या घोषणा, बूस्टर डोसबाबतही महत्त्वाची माहिती

PM Modi Speech Highlight : 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू : पंतप्रधान मोदी

COVID-19 Vaccine for Children : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला DCGI ची परवानगी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणं योग्य नव्हतं: अनिल पाटील
छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजितदादांच्या फोटोला जोडे.... राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray : लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
Bajrang Sonwane: बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nilam Gorhe Infont Video : उद्धव ठाकरे-नीलम गोऱ्हे आमनेसामने; पाहा काय घडलं?Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 17 डिसेंबर 2024: ABP MajhaSandeep Kshirsagar on Beed : आमदाराला 1 अन् गुंड वाल्मिक कराडला 2 सुरक्षारक्षक कसे? फडणवीसांना सवालSharad Sonawane : मंत्री करा, नाहीतर मला मतदारसंघात फिरु देणार नाही,अपक्ष आमदाराची फडणवीसांना विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणं योग्य नव्हतं: अनिल पाटील
छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजितदादांच्या फोटोला जोडे.... राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray : लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
Bajrang Sonwane: बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
Gold Rate Today : सोने चांदी दरात दुसऱ्या दिवशी घसरण, लग्नसराई संपताच दर घसरण्यास सुरुवात,सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
सोने चांदी दरात दुसऱ्या दिवशी घसरण, लग्नसराई संपताच दर घसरण्यास सुरुवात, सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
Australia vs India, 3rd Test : जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!
जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!
VIDEO कुणी केस ओढले, तर कुणी कानशीलात लगावली; म्युझिक लॉन्चसोहळ्यात मारहाण, प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्री एकमेकांना भिडले
प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्री एकमेकांना भिडले; म्युझिक लॉन्चसोहळ्यात मारहाण VIDEO
''मग फडणवीस साहेब त्याला जेलमध्ये टाकतील''; भुजबळांच्या नाराजीवर मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल
''मग फडणवीस साहेब त्याला जेलमध्ये टाकतील''; भुजबळांच्या नाराजीवर मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल
Embed widget