एक्स्प्लोर
मणिपूरची 'आयर्न लेडी' इरोम शर्मिला यांचा दारुण पराभव
इंफाळ : मणिपूरची आयर्न लेडी अशी ख्याती असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र शर्मिला यांना पराभवाचा जबर धक्का बसलेला आहे. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनी इरोम शर्मिलांना पराभवाची धूळ चारली.
पिपल्स रिसर्जन्स अँड जस्टिस अलायन्स (प्रजा) च्या प्रमुख असलेल्या इरोम चानू शर्मिला मणिपूरमधील थोबल मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. विशेष म्हणजे शर्मिला यांना अवघी 90 मतं मिळाली आहेत. शर्मिला यांनी मुख्यमंत्रिपद भूषवण्याची इच्छाही काही महिन्यांपूर्वी बोलून दाखवली होती.
निकालाच्या दिवशी सकाळी मात्र शर्मिला यांना विजयाची खात्री वाटत नसावी. पराभव झाल्यास 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा नशिब आजमवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. बळ, सत्ता आणि पैशाचा वापर सर्वच पक्ष उघडउघड करत आहेत, हे सगळ्यांना माहित आहे, असा आरोपही त्यांनी केला. मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झालं.
आयर्न लेडी इरोम शर्मिला यांचं उपोषण 16 वर्षांनी मागे
16 वर्षांपासून सुरु असलेलं उपोषण इरोम शर्मिला यांनी 9 ऑगस्ट 2016 रोजी सोडलं होतं. प्रदीर्घ कालावधीनंतर उपोषण सोडताना मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला भावुक झाल्या होत्या. मणिपूरमधील 'आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट' (अफ्स्पा) म्हणजेच सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा रद्द करण्यासाठी त्यांनी 2000 सालापासून उपोषण सुरु केलं होतं. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी नलिकेच्या मदतीनं जबरदस्ती लिक्विड डाएट दिलं जात होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement