एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षात न्यायमूर्ती रमण्णा निवृत्तीआधी महत्त्वाचा निर्णय देणार का?

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची  सुप्रीम कोर्टात सुनावणी 4 ऑगस्टपासून दोन वेळा लांबणीवर गेलेली सुनावणी आज तिसऱ्यांदा लांबणीवर गेली. आज होणारी सुनावणी आता मंगळवारी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचं (Maharashtra Political Crisis)  सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नेमकं काय होणार या उत्तरासाठीची प्रतीक्षा लांबत चालली आहे. आज होणारी सुनावणी एका न्यायमूर्तींच्या उपलब्धतेमुळे होऊ शकलेली नाही. सरन्यायाधीश रमण्णा (Chief Justice of India N.V.Ramana) यांच्या निवृत्तीची तारीख जवळ येत चालल्यानं आता त्याआधी काही महत्वाचा निर्णय होतो का याचं उत्तर उद्या कळेल. 

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची  सुप्रीम कोर्टात सुनावणी 4 ऑगस्टपासून दोन वेळा लांबणीवर गेलेली सुनावणी आज तिसऱ्यांदा लांबणीवर गेली. आज होणारी सुनावणी आता उद्या होईल अशी शक्यता आहे. उद्या विशेष खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल तो म्हणजे सरन्यायाधीश रमण्णा आपल्या निवृत्तीआधी काही मोठा निर्णय देणार की प्रकरण घटनापीठाकडे सोपवून मोकळे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे 

 26 ऑगस्ट ही न्या. रमण्णा यांच्या निवृत्तीची तारीख आहे. तर उद्या 23 ऑगस्टला अखेर या प्रकरणाची सुनावणी होत आहे. म्हणजे कारकीर्दीच्या शेवटच्या चार दिवसांत सरन्यायाधीश या प्रकरणाचं काय करणार हा महत्वाचा सवाल आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्याच अध्यक्षतेखाली या प्रकरणाची सुनावणी होत आहे.  आज ही सुनावणी लांबणीवर गेली, कारण सुप्रीम कोर्टाचे एक सरन्यायाधीश उपलब्ध नव्हते. आता उद्या विशेष पीठ काय करतं हे पाहावं लागेल. 

 काय अपेक्षित आहे उद्याच्या सुनावणीत?

  •   सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत, निवृत्तीआधी ते हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवतात का? हे उद्या कळेल
  •  प्रकरण घटनापीठाकडे गेले तर ते अधिक काळ लांबेल याचीही शक्यता
  • काही मुद्द्यांवर घटनापीठाकडे हे प्रकरण जाईल, पण काही मुद्द्यांवर कोर्ट आपला निकाल देतं का याचीही उत्सुकता असेल
  •  विशेषत: अपात्रतेसंदर्भातल्या कारवाईबाबत आता अजून किती काळ स्थगिती राहते हे पाहणं महत्वाचं असेल. 

दुसरीकडे निवडणूक आयोगात उत्तराची मुदतही उद्याच संपतेय. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे गटाकडून आयोगातही काय बाजू मांडली जाते हे पाहणं महत्वाचं असेल.  सुप्रीम कोर्टातली कार्यवाही होईपर्यंत निवडणूक आयोगात कुठलाही निर्णय होऊ नये हा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. पण उद्याच्या उत्तरानंतर आयोग पुढची पावलं काय उचलतं हे पाहावं लागेल. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Rohit Pawar and Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
Embed widget