एक्स्प्लोर
महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक
नवी दिल्ली : 68 व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा तिसरा क्रमांक आला आहे. राजपथावर 26 जानेवारील देशातील सर्व राज्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यातील कला-संस्कृती-परंपरेवर आधारित चित्ररथ तयार केले होते.
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या सिंहगर्जनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या कार्यावर आधारीत चित्ररथ महाराष्ट्रानं साकारला होता. या चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाच बक्षिस मिळालं.
महाराष्ट्राच्या चित्ररथात 'केसरी' वृत्तपत्राच्या छपाई यंत्राची प्रतिकृतीही दाखवण्यात आली होती. तसेच गणेशोत्सव आणि शिवजयंतीचा देखावाही तयार केला होता.
राजपथावरील संचलनात अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाने पहिला क्रमांक, तर त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
फोटो : राजपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचं पथसंचलन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement