Rekha Singh : लग्नानंतर अवघ्या 15 महिन्यांनी पती शहीद, शिक्षिकेची नोकरी सोडून पत्नी सैन्यात भरती
Lieutenant Rekha Singh : शहीद दीपक सिंह (Deepak Singh) यांच्या पत्नी रेखा सिंह सैन्यात लेफ्टनंट बनल्या आहेत. पतीची देशभक्तीच्या भावनेमुळे शिक्षिकेची नोकरी सोडून सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.
Shahid Naik Deepak Singh Wife Lieutenant in Indian Army : गलवान घाटीमध्ये शहीद झालेले लान्स नाईक दीपक सिंह (Deepak Singh) यांची पत्नी सैन्यात अधिकारी झाल्या आहेत. वीरचक्र पुरस्कार विजेते शहीद दीपक सिंह यांची पत्नी रेखा सिंह (Rekha Singh) यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर कार्यरत झाल्या आहेत. दीपक सिंह 15 जून 2020 रोजी शत्रूसोबत दोन हात करताना शहीद झाले होते. त्यांची पत्नी रेखा यांनी शहीद पती दीपक सिंह यांची देशभक्ती आणि शौर्याची भावना तेवत ठेवण्यासाठी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.
भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट बनल्या रेखा सिंह
शहीद लान्स नाईक दीपक सिंह यांच्या पत्नी रेखा सिंह या आधी शिक्षिका होत्या. रेखा सिंह यांनी सांगितले की, माझ्या पतीच्या हौतात्म्याचे दु:ख आणि देशभक्तीमुळे मी शिक्षिकेची नोकरी सोडून सैन्यात अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. पतीच्या स्वप्नामुळेच रेखा सिंह यांनी भारतीय सैन्यात येण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं.
Madhya Pradesh | Rekha Singh, wife of Naik Deepak Singh who was killed in a skirmish with Chinese soldiers in June 2020, has fulfilled her husband's dream of becoming a lieutenant in the Indian Army. (07.05) pic.twitter.com/H1tXDjiXfl
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 8, 2022
लग्नानंतर 15 महिन्यांनी पती शहीद
रेखा सिंह यांचा विवाह बिहार रेजिमेंटच्या 16 व्या बटालियनचे नाईक दीपक सिंह यांच्याशी झाला. रेखा आणि दीपक यांच्या लग्नाला केवळ 15 महिनेच झाले होते. शत्रूशी लढताना दीपक यांना वीरमरण आले. पण देशाप्रती असलेल्या देशभक्तीमुळे रेखा सिंह यांना सैन्यात भरती होण्याची प्रेरणा मिळाली.
दीपक सिंह 2020 मध्ये गलवान खोऱ्यातील शहीद
रेखा सिंह यांचे शिक्षिकेची नोकरी सोडून सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण झाले, पण ते इतके सोपे नव्हते. पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर रेखा यांनी हार न मानता प्रयत्न सुरुच ठेवले. त्यामुळेच त्यांना या मेहनतीचं फळ मिळालं आहे. त्यांची आता लष्करात लेफ्टनंट पदावर निवड झाली. रेखा सिंह यांचे पती दीपक सिंह 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. दीपक सिंह यांना त्यांच्या शौर्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मरणोत्तर 'वीर चक्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या