एक्स्प्लोर

लेफ्टनंट स्वाती महाडिक-निधी दुबेंचं पंतप्रधानांकडून कौतुक

लेफ्टनंट स्वाती महाडिक आणि निधी दुबे या दोन्ही महिलांनी देशभक्ती आणि महिला शक्तीचं अनोखं रुप सर्व देशवासियांना दाखवल्याचं मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : महाराष्ट्राची वीरांगना अर्थात लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्यासह निधी दुबे यांच्या धैर्य आणि धाडसाचा मोदींनी दाखला दिला. या दोन्ही महिलांनी देशभक्ती आणि महिला शक्तीचं अनोखं रुप सर्व देशवासियांना दाखवल्याचं मोदी म्हणाले. पती कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी सैन्यात भरती होण्याच्या निश्चय केला होता. 15 दिवसांपूर्वीच त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. पतीच्या पार्थिवावर देशसेवेचा निर्धार जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना, सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. अतिरेक्यांना टिपून मारणाऱ्या संतोष महाडिक हे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडले. 17 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचा हा जवान शहीद झाला. या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही देण्यात आला होता. त्यांच्या पार्थिवावर पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जातील, असा निर्धार केला होता. पतीच्या निधनानंतर निधी मिश्रा सैन्यात सामील निधी मिश्रा दुबे प्रेग्नंट असताना त्यांचे पती मुकेश दुबे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुकेश दुबे हे महर रेजिमेंटमध्ये नाईकपदावर कार्यरत होते. सैन्यात असणं म्हणजे काय असतं हे मुलगा सुयशला दाखवण्यासाठी निधी यांनी देशसेवेचा निर्धार केला. पण हे सोपं नव्हतं. पहिल्या पाच प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आल. "पण आता तो भूतकाळ आहे. आता मी देशसेवेसाठी तयार आहे," असं निधी मिश्रा म्हणतात. निवृत्त शिक्षक चंद्रकांत कुलकर्णींचंही मोदींकडून कौतुक स्वच्छतेसाठी दान करणाऱ्या महाराष्ट्रातील निवृत्त शिक्षकाचाही मोदींनी उल्लेख केला. चंद्रकांत कुलकर्णी यांचं उदाहरण दिल्यानंतर देशभरातून अनेक जण पुढे आल्याचं मोदींनी सांगितलं. भारतात पर्यटनाला चालना देण्यासाठी तुमच्या राज्यातील सात सर्वोत्तम टुरिस्ट डेस्टिनेशन्स तुम्हाला माहिती हवीत, असंही मोदी म्हणाले. मन की बातची तीन वर्ष मन की बात या कार्यक्रमाचा आज 36 वा भाग प्रसारित झाला. आज या कार्यक्रमाची सुरुवात होऊन तीन वर्ष पूर्ण झाली. मन की बातची तीन वर्ष ही देशवासियांच्या भावना आणि अनुभवाचा प्रवास आहेत, असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. संबंधित बातम्या अभिमानाचे दोन स्टार खांद्यावर, वीरपत्नी स्वाती महाडिक 'इंडियन आर्मी'त रुजू सातारा सैनिक स्कूलच्या स्टेडियमला शहीद महाडिकांचं नाव देखना है जोर कितना…शहीद महाडिकांची पत्नी ‘इंडियन आर्मी’त! शहीद संतोष महाडिक यांचं शेवटचं व्हॉट्सअॅप स्टेटस शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र ‘माझी मुलगी आणि मुलगा लष्करातच जातील’ वीरपत्नीचा निर्धार शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन शहिदांच्या कुटुंबियांबाबत उदयनराजे म्हणतात…

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
Embed widget