एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
वीरपत्नी स्वाती महाडिकांची प्रेरणादायी कहाणी दहावीच्या पुस्तकात!
मराठीच्या पुस्तकात वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा सांगण्यात आली आहे.
![वीरपत्नी स्वाती महाडिकांची प्रेरणादायी कहाणी दहावीच्या पुस्तकात! ssc syllabus 2018: lesson on lieutenant swati mahadik in class 10th marathi वीरपत्नी स्वाती महाडिकांची प्रेरणादायी कहाणी दहावीच्या पुस्तकात!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/09110318/Swati_Mahadik_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात नवा कोरा आणि अभिमानास्पद धडा समावेश करण्यात आला आहे. मराठीच्या पुस्तकात वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा सांगण्यात आली आहे.
लेफ्टनंट स्वाती महाडिक या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आहेत. कर्नल संतोष महाडिक हे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झाले होते.
अभिमानाचे दोन स्टार खांद्यावर, वीरपत्नी स्वाती महाडिक 'इंडियन आर्मी'त रुजू
पतीच्या वीरमरणानंतर उच्चशिक्षीत स्वाती यांनीही खडतर प्रशिक्षण घेऊन, सैन्यात जाणंच पसंत केलं. स्वाती महाडिक गेल्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यांची प्रेरणादायी कहाणी दहावीच्या पुस्तकात सांगण्यात आली आहे. सातारा आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. पती निधनाचे असीम दु:ख बाजूला ठेवून, पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम, अशी गौरवगाथा दहावीच्या पुस्तकात मांडण्यात आली आहे.'माझी मुलगी आणि मुलगा लष्करातच जातील' वीरपत्नीचा निर्धार
नुकतीच दहावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकं बाजारात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे दहावीचे उन्हाळी वर्गही सुरुवात होत आहेत. गेल्या वर्षापर्यंत दहावीच्या सर्व पुस्तकांचा संच 577 रुपयांना होता, आता तो 614 रुपयांना उपलब्ध आहे. एका संचामागे 37 रुपयांची वाढ झाली आहे. संबंधित बातम्याBLOG : आजमाले...
देखना है जोर कितना...शहीद महाडिकांची पत्नी 'इंडियन आर्मी'त !'माझी मुलगी आणि मुलगा लष्करातच जातील' वीरपत्नीचा निर्धार
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
बॉलीवूड
कोल्हापूर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion