Madhabi Puri Buch SEBI chairperson: माधवी पुरी बुच यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Madhabi Puri Buch SEBI chairperson: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (SEBI) विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी (Ajay Tyagi) यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी संपत आहे.
Madhabi Puri SEBI chairperson: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (SEBI) विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी (Ajay Tyagi) यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी संपत आहे. त्यांच्या जागी आता माधवी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं माहिती दिलीय. ही नियुक्ती सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी असल्याची माहिती समोर आलीय.
हिमाचल प्रदेश केडरचे 1984 बॅचचे आयएएस अधिकारी अजय त्यागी यांनी पाच वर्षापूर्वी (1 मार्च 2017) सेबीच्या अध्यक्षपदाचा कारभार संभाळला होता. त्यावेळी अजय त्यागी यांची केवळ तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कालावधीत सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, ऑगस्ट 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ आणखी 18 महिन्यांनी वाढवण्यात आला. त्यानुसार, त्यागी यांचा कार्यकाळ आज संपत आहे. माधवी पुरी बूच यांची तीन वर्षांसाठी सेबीच्या अध्यक्षपदासाठी नियुक्ती करण्यात आलीय.
माधवी पुरी यांनी लिंक्डइन प्रोफाईलमध्ये असं नमूद केलंय की, त्यांनी 12 वर्ष आयसीआयसीआय बँकेत विविध प्रोफाईलमध्ये काम गेलंय. त्या 1997 ते 2002 पर्यंत मार्केटिंग आणि सेल्सच्या प्रमुख होत्या. त्यानंर 2002 पासून तर, 2003 पर्यंत त्यांनी प्रॉडक्ट डेव्हलॉपमेन्टच्या प्रमुख म्हणून काम केलंय. त्यानंतर, 2004 ते 2006 पर्यंत त्या ऑपरेशन्सच्या प्रमुख होत्या आणि कार्यकारी संचालक होत्या.
हे देखील वाचा-
- 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीएमध्ये होणार 14 टक्के वाढ
- Bengal Assembly : टायपिंग चुकीचा फटका! PM चं AM झाल्यानं पश्चिम बंगाल विधानसभेचं अधिवेशन रात्री 2 वाजता
- UP Election 2022: विधानसभा निवणुकीत बसपाचा हत्ती कुठे हरवला? जाणून घ्या युपीत काय आहे पक्षाची स्थिती...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha