एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

सिलेंडरच्या किंमतीत दर महिन्याला वाढ, मार्च 2018पर्यंत अनुदान रद्द!

अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत दर महिन्याला वाढ होणार असून मार्च 2018पर्यंत सिलेंडरवरील अनुदान पूर्णपणे रद्द होणार आहे.

नवी दिल्ली : अनुदानित गॅस सिलेंडरच्या (एलपीजी) किंमतीत यापुढे दर महिन्याला 4 रुपयांनी वाढ होणार असून गॅस सिलेंडरवर देण्यात येणारं अनुदान मार्च 2018 पर्यंत पूर्णपणे रद्द होणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी आज याबाबतची माहिती दिली. दर महिन्याला अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 4 रुपयांनी वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काय आहेत सरकारचे नवे आदेश धर्मेंद प्रधान यांनी याबाबतची माहिती लोकसभेत लेखी स्वरुपात दिली. सरकारने हे आदेश 30 मे 2017 रोजीच दिले होते. यामध्ये तेल कंपन्यांना 1 जून 2017पासून दर महिन्याला प्रति सिलेंडरमागे 4 रुपये वाढवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश मार्च 2018 किंवा सिलेंडरवर दिलं जाणारं अनुदान संपेपर्यंत लागू असणार आहेत. सरकारी तेल कंपन्या (इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम) यांना सिलेंडर अनुदान मार्च 2018 पर्यंत संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिलेंडरवर देण्यात येणार अनुदान पूर्णपणे रद्द करण्यासाठी सरकार मागील अनेक दिवसांपासून तयारी करत आहे. 1 जुलै 2016 पासून एलपीजी सिलेंडरवर दर महिन्याला 2 रुपये वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आतापर्यंत एकूण 10 वेळा सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. एका कुटुंबाला किती अनुदानित सिलेंडर? देशातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एकूण 12 अनुदानित सिलेंडर मिळतात. यानंतर सिलेंडर हवा असल्यास तो बाजारभावानं विकत घ्यावा लागतो. मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत किती? मुंबईमध्ये अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत (14.2 किलो) 488 रुपये आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 554 रुपये आहे. म्हणजेच विनाअनुदानित सिलेंडरसाठी 66 रुपये जादा मोजावे लागतात. यापुढे 66 रुपये मिळणारं अनुदान टप्प्याटप्प्यानं कमी होत जाणार असून मार्च 2018 पर्यंत 554 रुपयांना सर्वांना सिलेंडर खरेदी करावं लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget